महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘मिक्सचर’मध्ये अहाना अन् अनुष्का

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का रंजन ही ‘मिक्सचर’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक हनीश कालिया यांच्या या वेबसीरिजमध्ये अनुष्का आणि अहाना कुमरा एकत्र दिसून येतील. ही सीरिज क्राइम आणि सस्पेन्सच्या जगाचे सत्य दाखविणार आहे. याचे चित्रिकरण गोवा तसेच मुंबईत पार पडले आहे. अहाना कुमार यापूर्वी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर, सलाम वेंकी, लिपस्टिक अंडर माय बुर्का, खुदा हाफिज यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. मिक्सचर या सीरिजमध्ये अनुष्का रंजन महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ही एक अॅक्शन थ्रिलर सीरिज असून यात मी आव्हानात्मक भूमिका साकारली असल्याचे अनुष्काने सांगितले आहे. अनुष्काचे वडिल शशी रंजन हे बॉलिवूड दिग्दर्शक आहेत. अनुष्का यापूर्वी वेडिंग पुलाव आणि बत्ती गुल मीटर चालू या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article