‘सैयारा’त अहान पांडेला संधी
मोहित सुरीचा रोमँटिक चित्रपट
यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी एक रोमँटिक चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘सैयारा’ आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची अधिकृत घोषणा केली आहे. तसेच त्यांनी याच्या प्रदर्शनाची तारीखही उघड केली आहे.
या चित्रपटात अहान पांडे आणि अनीत प•ा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. अहान पांडे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अहान हा चंकी पांडे यांचे बंधू चिक्की पांडे यांचा पुत्र आहे. यापूर्वी त्याने अनेक लघुपटांमध्ये काम केले आहे. तर अनीत प•ा ही ‘बिग गर्ल्स डोंट क्राय’ या वेबसीरिजमध्ये दिसून आली आहे. तसेच 2022 मधील चित्रपट ‘सलाम वेंकी’ या चित्रपटातही तिने काम केले आहे.
मोहित सूरीचा हा चित्रपट 18 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मोहित सूरीने यापूर्वी ‘जहर’, ‘कलयुग’, ‘आवारापन’ यासारखे हिट चित्रपट दिले आहेत. तसेच तो ‘आशिकी 2’, ‘हमारी अधूरी कहानी’ आणि हाफ गर्लफ्रेंड या रोमँटिक चित्रपटांसाठी देखील तो ओळखला जातो. यापूर्वी त्याने ‘एक विलेन रिटर्न्स’चे दिग्दर्शन केले होते.