For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृषी अधिकारी अक्षय चव्हाण यांना 'तिफन कृषी गौरव पुरस्कार' प्रदान

05:56 PM Apr 29, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कृषी अधिकारी अक्षय चव्हाण यांना  तिफन कृषी गौरव पुरस्कार  प्रदान
Advertisement

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पुण्यात वितरण

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

तिफन फाउंडेशनचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय 'तिफन कृषी गौरव पुरस्कार २०२५' कोलगावचे सहायक कृषी अधिकारी अक्षय चव्हाण यांना राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा एक असे एकूण ३४ तिफन गौरव पुरस्कार जिल्हा व तालुका स्तरावर शेतकऱ्यांसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या कृषी अधिकारी व कर्मचारी यांना तसेच राज्यात कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६ शेतकरी, संस्था व शास्त्रज्ञ यांनाही राज्यस्तरीय तिफन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माझा शेती संकल्प स्पर्धेच्या १२ विजेत्यांनाही सन्मानित करण्यात आले.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राज्याचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गडे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, ॲग्रोवनचे कार्यकारी संपादक रमेश जाधव, राज्याचे कृषी विस्तार संचालक रफिक नाईकवाडी, पुणे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने, तिफन फाउंडेशनचे संस्थापक सुखदेव जमधडे, समन्वयक श्री अनंत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी सातत्याने काम करणाऱ्या तसेच कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे शेतकरी, शास्त्रज्ञ, संशोधक आणि संस्था अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करणे हा तिफण फाउंडेशनचा उद्देश आहे. कोलगावचे सहाय्यक कृषि अधिकारी अक्षय चव्हाण यांनी कोलगाव सजा मध्ये गेली ५ वर्षे कृषी क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण प्रगत उपक्रम सातत्याने राबविले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.