कृषी यांत्रिकी मेळावा 29 नोव्हेंबरपासून
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. यासाठी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यावरही सरकार भर देत आहे. अशा प्रकारच्या स्वस्त किंमतींमध्ये शेतकऱ्यांना कृषीयंत्र खरेदी करता यावे यासाठी राज्यपातळीवर कृषी यांत्रिकी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बिहार येथील पाटना गांधी मैदानात सुरु होणार असून या मेळाव्यात देशभरातील शेतकरी सहभागी होऊ शकणार आहेत.
केव्हा व कधी चालणार मेळावा
कृषी यांत्रिकी मेळावा (अॅग्रो बिहार2024) 29 नोव्हेंबर रोजी सुरु होणार असून तो 2 जानेवारीपर्यंत चालणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत यंत्रांचा प्रदर्शनात समावेश करण्यात येणार आहे. हा मेळावा बिहारसोबत मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब, राजस्थान आदी. राज्यांमधील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग राहणार असल्याचा अंदाज आहे.
प्रवेश विनाशुल्क
या प्रदर्शनामध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
शेतकऱ्यांसाठी विशेष नियोजन :
या प्रदर्शनामध्ये फक्त शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्र व उपकरणांची मांडणी करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ही यंत्रे कशी चालवावी यासोबत अन्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती आहे. चार दिवसांचा सांस्कृतिक मेळावाही आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.