न्हावेलीत वन्यप्राण्यांचा कहर ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
12:59 PM Nov 21, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली /वार्ताहर
न्हावेली नागझरवाडी परिसरात वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे सातत्याने नुकसान होत असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.शेती आणि बागायती पिकांवर गवारेड्यांच्या कळपाने हल्ला चढवत मोठे नुकसान केले.आधीच अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांचा आणखी एक त्रास सहन करावा लागत आहे . यामुळे तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी शिवसेना शिंदे गट सावंतवाडी उपतालुकाप्रमुख तथा उपसरपंच अक्षय पार्सेकर नुकसान ग्रस्त शेतकरी पांडुरंग सावळ,प्रकाश सावळ,वन अधिकारी प्रकाश रानगिरे तसेच ग्रामस्थ राज धवण व नवनाथ पार्सेकर यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकरी वर्गाने वन्यप्राण्यांना बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article