अमराराजा पियाजियो यांच्यात बॅटरी निर्मितीसाठी करार
तेलंगणात होणार बॅटरी, चार्जरची निर्मिती
वृत्तसंस्था/ हैदराबाद
बॅटरी उत्पादनाकरता अमराराजा आणि पियाजिओ यांच्यामध्ये करार झाला आहे. अमरा राजा यांनी इटलीतील पियाजिओ समूहाची भारतीय सहकारी कंपनी पियाजिओ वेहिकल्स यांच्यासोबत एक सहकार्याचा करार केला आहे. सहकार्याच्या कराराअंतर्गत पियाजिओ कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकी आणि तिचाकी वाहनांकरता आवश्यक असणाऱ्या लिथियम आयन सेल, बॅटरी पॅक आणि चार्जर यांच्या विकासासाठी आणि पुरवठा यावर भर देण्यात येणार आहे. 2020 मध्ये उभय कंपन्यांमध्ये भागीदारी झालेली आहे. यादरम्यान कंपनीने 50,000 एनएमसी लिथियम आयन बॅटरी पॅक व इव्ही चार्जरचा पुरवठा करण्यात आला आहे.
तेलंगणात होणार उत्पादन
या अंतर्गत अमरा राजा तेलंगणातील दीवीतीपल्ली येथे आपल्या कारखान्यामध्ये लिथियम सेल आणि चार्जरची निर्मिती करणार आहे. देशांतर्गत उत्पादनामध्ये वाढ करण्यासोबतच भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्राच्या विकासाला सहकार्य करण्याच्या कार्यासाठी अमरा राजाने पुढाकार घेतलेला आहे.