For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अग्नि-6 चे डिझाइन पूर्ण, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

06:49 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
अग्नि 6 चे डिझाइन पूर्ण  सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा
Advertisement

अग्नि-6 क्षेपणास्त्रावर डीआरडीओ प्रमुखांचे मोठे वक्तव्य : हिरवा कंदिल मिळताच काम सुरू

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

डीआरडीओ प्रमुखांचे हे वक्तव्य भारताच्या रणनीतिक क्षमतेला आणखी मजबूत करणाऱ्या अग्नि-6 प्रकल्पावरून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांदरम्यान समोर आले आहे. अग्नि-6 भारताचे पुढील आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) असेल, जे 10 हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम असेल.

Advertisement

अग्नि-6 क्षेपणास्त्र काय आहे?

अग्नि-6 डीआरडीओकडून विकसित करण्यात येणारे भारताचे सर्वात आधुनिक आणि दीर्घ पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. अग्नि-5 चे हे पुढील आणि अधिक शक्तिशाली वर्जन असेल. हे क्षेपणास्त्र एमआयआरव्ही (मल्टीपल इंडिपेडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हीकल) तंत्रज्ञानाने युक्त असणार, म्हणजेच एकाच क्षेपणास्त्रात अनेक आण्विक वॉरहेड जोडता येणार आहेत, जे वेगवेगळ्या लक्ष्यांवर एकाचवेळी निशाणा साधू शकतात. हे क्षेपणास्त्र मुख्यत्वे स्ट्रॅटेजिक डिटरेंससाठी विकसित केले जातेय, यामुळे भारत चीनच्या कुठल्याही हिस्स्याला सहजपणे लक्ष्य करू शकेल आणि आण्विक ट्राएंडला आणखी मजबूत करू शकणार आहे.

डीआरडीओने अग्नि-6 चे डिझाइन पूर्ण पेले, आता प्रोटोटाइप निर्मितीचे काम सुरू आहे. 2025 मध्ये डिझाइन अंतिम झाले आहे, परंतु पूर्ण स्वरुपात प्रकल्प पुढे नेण्यास आणि फ्लाइट टेस्ट करण्याचा निर्णय  सरकार घेणार आहे. डीआरडीओ तांत्रिक स्वरुपात पूर्णपणे तयार असून प्रतीक्षा केवळ सरकारच्या मंजुरीचे असल्याचे डॉ. कामत यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. भारताने सध्या अग्नि-5 तैनात केले असून ते 5 हजार किलोमीटरपेक्षा अधिक मारक पल्ला असलेले क्षेपणास्त्र आहे.

अग्नि-6 आवश्यक का?

भारत दोन आघाड्यांवर (चीन आणि पाकिस्तान) सुरक्षा आव्हानांचा सामना करतोय. चीनकडे 10 हजार किलोमीटरपेक्षा अधिक मारक पल्ला असलेली अनेक आयसीबीएम आहेत. अग्नि-6 भारताला समान स्तराची क्षमता मिळवून देईल, ज्यामुळे सेकंड स्ट्राइक कॅपेबिलिटी आणखी मजबूत होईल. एमआयआरव्ही तंत्रज्ञानाद्वारे एक क्षेपणास्त्र अनेक शहरे किंवा सैन्यतळांना एकाचवेळी नष्ट करू शकते. ज्यामुळे शत्रूसाठी संरक्षण अत्यंत अवघड ठरते. हे क्षेपणास्त्र भारताच्या आण्विक डिटरेंसला आणखी विश्वसनीय करणार आहे.

Advertisement
Tags :

.