कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शाळा तेथे दाखला मोहिमेचा कुडाळला शुभारंभ

05:17 PM Sep 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वय अधिवास व जातीचे दाखले करणार वितरित

Advertisement

कुडाळ:

Advertisement

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून "शाळा तेथे दाखला" मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना वय अधिवास प्रमाणपत्र व जातीचे दाखले उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.कुडाळ तालुक्यात या उपक्रमाचा शुभारंभ येथील कुडाळ हायस्कूल येथे करण्यात आला.या उपक्रम शुभारंभप्रसंगी कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे कुडाळ हायस्कूल येथे कार्यक्रमस्थळी भेट देऊन कार्याचा आढावा घेतला. तसेच श्री. वसावे यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आठवीची विद्यार्थीनी आर्या पांडुरंग राणे हिला तिचे वय अधिवास प्रमाणपत्र केवळ एका तासातच वर्गात जाऊन वितरीत केले. ही उपक्रमाची विशेष नोंद घेण्याजोगी बाब ठरली.आज दिवसभरात विद्यालयातील 223 विद्यार्थ्यांचे वय अधिवास प्रमाणपत्राचे अर्ज स्वीकारण्यात आले असून त्यावरील प्रक्रिया पूर्ण करून 15 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत.या पद्धतीने कुडाळ तालुक्यातील 268 शाळांमधील एकूण 13 हजार 844 विद्यार्थ्यांना वय अधिवास प्रमाणपत्र तसेच जातीचा दाखला देण्यात येणार आहे. महसूल विभाग, शिक्षण विभाग, शाळा प्रशासन, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले शालेय पातळीवरच उपलब्ध होणार असून पालक व विद्यार्थ्यांचा वेळ, खर्च व श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.या प्रसंगी कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, कुडाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक विपीन वराडे,सहाय्यक शिक्षक विजय मयेकर, शिक्षक निखिल ओरोसकर, सीएससी सेवाकेंद्र चालक वैभव जाधव तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# traun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article