For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झोमॅटोपाठोपाठ, स्विगीवरुनही पदार्थ मागविणे झाले महाग

06:12 AM Mar 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
झोमॅटोपाठोपाठ  स्विगीवरुनही पदार्थ मागविणे झाले महाग
Advertisement

प्लॅटफॉर्म फीमध्ये स्विगीने केली 17 टक्क्यांची वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमाटो पाठोपाठ आता स्विगीवरूनही जेवण मागवणे महाग झाले आहे. कंपनीने 24 मार्चपासून प्रत्येक ऑर्डरवरील प्लॅटफॉर्म फीमध्ये 17 टक्क्यांची वाढ केली आहे. 14 ऐवजी, वापरकर्त्यांना आता प्रत्येक ऑर्डरवर 17.58 (जीएसटीसह) म्हणजेच 3.58 अधिक प्लॅटफॉर्म फी भरावी लागेल. डिलिव्हरी ऑपरेशन्सच्या खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.

Advertisement

प्लॅटफॉर्म शुल्क एप्रिल 2023 पासून सुरू

कंपनीने 7 महिन्यांत दुसऱ्यांदा प्लॅटफॉर्म शुल्कात वाढ केली आहे. यापूर्वी ऑगस्ट-2025 मध्ये त्यात 17 टक्के म्हणजेच 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर

प्लॅटफॉर्म शुल्क 12 रुपयांवरून 14 रुपये करण्यात आले. स्विगीने एप्रिल 2023 मध्ये सर्वप्रथम प्लॅटफॉर्म शुल्क लागू केले, जेणेकरून कंपनीला आपले आर्थिक स्थितीत सुधारणा करता येईल. तेव्हापासून कंपनीने हळूहळू या शुल्कात अनेक वेळा वाढ केली आहे. सुरुवातीला हे शुल्क 2 रुपये होते.

स्विगीचे प्लॅटफॉर्म शुल्क झोमॅटोच्या बरोबरीचे

झोमॅटोने 20 मार्च रोजी आपले प्लॅटफॉर्म शुल्क 19 टक्के किंवा 2.40 ने वाढवून 14.90 (जीएसटी वगळून) केले. कर (जीएसटी) जोडल्यानंतर, दोन्ही कंपन्यांचे प्रभावी प्लॅटफॉर्म शुल्क आता अंदाजे 17.58 झाले आहे. आता तुम्हाला दोन्ही प्लॅटफॉर्मवरून जेवण ऑर्डर करण्यासाठी जवळपास समान अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

स्विगीने 7 महिन्यांत दुसऱ्यांदा आपल्या प्लॅटफॉर्म शुल्कात वाढ केली

एप्रिल 2023                   2         (सुरुवात)

जानेवारी 2024              5

जुलै 2024                    6

ऑक्टोबर 2024           10

ऑगस्ट 2025              12

ऑक्टोबर 2025           14

मार्च 2026                 17.58

Advertisement

.