For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | देवदर्शन करून माहेरी भेट दिली, पण गावाकडे परतताना रणदेवीवाडीजवळ नेमकं काय घडलं? विवाहितेचा दुर्दैवी अंत, १ वर्षाचा चिमुरडा.....

10:36 AM Jun 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   देवदर्शन करून माहेरी भेट दिली  पण गावाकडे परतताना रणदेवीवाडीजवळ नेमकं काय घडलं  विवाहितेचा दुर्दैवी अंत  १ वर्षाचा चिमुरडा
Advertisement

                                 रणदेवीवाडीजवळ भीषण अपघात;

Advertisement

कसबा सांगावः सौंदत्ती येथून देवदर्शन करून दुचाकीवरून परतत असताना रणदेवीवाडीजवळ झालेल्या अपघातात विवाहितेचा मृत्यू झाला तर एक वर्षाचा मुलगा जखमी (वय ३१, मौजे सांगाव, ता. कागल) असे मृत महिलेचे नाव आहे. तर एक वर्षाचा मुलगा सार्थक (वय १) जखमी झाला आहे.झाला.

सविता गणेश मगदूम सविता मगदूम हलविण्यात आले आत्मानमिळालेल्या माहितीनुसार, मगदूम दाम्पत्य देवदर्शनासाठी दुचाकीवरून सौंदत्ती येथे गेले होते. दर्शन आटोपून मंगसुळी व नृसिंहवाडी मार्गे माहेर असलेल्या अब्दुललाट येथे भेट देऊन ते गावाकडे परतत होते. यावेळी रणदेवीवाडीजवळ सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावरील खड्यात दुचाकी गेल्याने अपघात झाला. सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला.अपघाताचे गांभीर्य ओळखूनरस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी बाहनधारकांनी त्यांना तत्काळ हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

Advertisement

सविता मगदूम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी कागल येथील खासगी रुग्णालयात त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी कोल्हापूर येथील रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदनानंतर पहाटेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement
Tags :

.