महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा घसरण

07:00 AM Nov 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 836 तर निफ्टी 285 अंकांनी नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणामुळे भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी मोठी घसरण नोंदवली. नफा घेणे, विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री आणि कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीतील कमकुवत निकाल यामुळे बाजार घसरणीसोबत बंद झाले आहेत. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 836.34 अंकांनी घसरून 1.04 टक्क्यांसोबत निर्देशांक 79,541.79 वर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील 284.70 अंकांच्या घसरणीसह 24,199.35 वर बंद झाला.

सेन्सेक्सवरील 30 कंपन्यांपैकी केवळ स्टेट बँक ऑफ इंडिया आणि टीसीएसचे समभाग वधारले आहेत. तसेच उर्वरित समभाग बंद झाले. टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरले. निफ्टी-50 कंपन्यांपैकी अपोलो हॉस्पिटल्स आणि टाटा स्टील वगळता इतर सर्व निर्देशांकातील समभाग नुकसानीसह बंद झाले. हिंडाल्को इंडस्ट्रीज, अदानी एंटरप्रायजेस, ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह आणि अल्ट्राटेक सिमेंट निफ्टी 50 वर पोहोचले.

बाजारातील घसरणीची प्रमुख कारणे

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article