For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सूर्य-चंद्रानंतर कृष्णविवराचे रहस्यही उलगडणार!

06:51 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
सूर्य चंद्रानंतर कृष्णविवराचे रहस्यही उलगडणार
the sun and the moon
Advertisement

नववर्षाच्या प्रारंभी आज इस्रो ऐतिहासिक उपग्रह प्रक्षेपित करणार

Advertisement

► वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा

भारत पुन्हा एकदा नवा इतिहास रचून नववर्षाची सुऊवात करणार आहे. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 नंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सोमवारी पहिला एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (एक्स्पोसॅट) प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज आहे. कृष्णविवरांसारख्या खगोलीय सृष्टीची रहस्ये उलगडणाऱ्या या प्रक्षेपणाने नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 9.10 वाजता पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल रॉकेटवर प्रक्षेपित केले जाईल. या उपग्रहामध्ये बसवलेली दुर्बीण बेंगळूरस्थित रमण संशोधन संस्थेने बनवली आहे.

Advertisement

1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता इस्रो इतिहास रचणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एक्स्पोसॅट (Xझ्दएAऊ) उपग्रह वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रक्षेपित केला जाईल. हा उपग्रह अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करेल. तसेच त्यांच्या स्रोतांची छायाचित्रे घेऊन महत्त्वपूर्ण संशोधन करणार आहे. एक्स्पोसॅट उपग्रह 650 किमी उंचीवर तैनात केला जाईल.  हा उपग्रह पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हा अशा विश्वातील 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करेल. 2017 मध्ये इस्रोने हे अभियान सुरू केले होते. या मोहिमेचा खर्च 9.50 कोटी ऊपये आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे 22 मिनिटे एक्स्पोसॅट उपग्रह आपल्या निर्धारित कक्षेत पोहोचणार आहे. या उपग्रहामध्ये ‘पोलिक्स’ आणि ‘एक्सपेक्ट’ असे दोन पेलोड आहेत. या मोहिमेचे आयुष्य सुमारे 5 वर्षे असेल. ऑक्टोबरमध्ये गगनयान चाचणी वाहन ‘डी1 मिशन’च्या यशानंतर हे प्रक्षेपण केले जात आहे.

‘ब्लॅक होल’चे संशोधन होणार

एक्स्पोसॅटच्या प्रक्षेपणासाठी 25 तासांचे काउंटडाऊन रविवारी 31 डिसेंबर रोजी सुरू झाले. ‘पीएसएलव्ही-सी58’साठी रविवारी सकाळी 8.10 वाजता 25 तासांची उलटी गिनती सुरू झाल्याचे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाईट (एक्स्पोसॅट) क्ष-किरण स्त्राsताचे रहस्य उलगडण्यास आणि ‘ब्लॅक होल’च्या रहस्यमय जगाचा अभ्यास करण्यास मदत करेल. अंतराळ-आधारित ध्रुवीकरण मापनांमध्ये खगोलशास्त्रीय स्त्राsतांकडून एक्स-रे उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा स्पेस एजन्सीचा पहिला समर्पित वैज्ञानिक उपग्रह आहे.

‘नासा’कडूनही अभ्यास

भारतीय अंतराळ एजन्सी इस्रोव्यतिरिक्त, यूएस स्पेस एजन्सी ‘नासा’ने डिसेंबर 2021 मध्ये सुपरनोव्हा स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून बाहेर पडणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता. क्ष-किरण ध्रुवीकरणाचा अवकाश-आधारित अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा ठरत असल्यामुळे एक्स्पोसॅट मोहीम महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Tags :

.