‘धुरंधर’च्या यशानंतर सौम्याला मिळाली मोठी संधी
बॉलिवूड चित्रपटात झाली एंट्री
सौम्या टंडन ही अभिनेत्री यापूर्वी ‘भाभी जी घर पर हैं’मुळे लोकप्रिय झाली होती. परंतु तिला जगभरात प्रसिद्धी मिळवून देण्याचे श्रेय धुरंधर या चित्रपटाचे आहे. या चित्रपटात तिची भूमिका छोटी परंतु दमदार होती. चित्रपटात रहमान डकैतला थप्पड लगावतानाच्या दृश्यामुळे सौम्या ही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. लोकांनी तिच्या भूमिकेचे कौतुक केले आणि याचाच परिणाम म्हणजे अभिनेत्रीला आणखी एक मोठा चित्रपट मिळाला आहे.
सूरज बडजात्या यांच्या ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटात सौम्या दिसून येणर आहे. या चित्रपटाद्वारे सूरज बडजात्या हे स्वत:च्या रोमँटिक जॉनरच्या दिशेने वापसी करत आहेत. ये प्रेम मोल लिया या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहे. यातील सौम्याची भूमिका कोणत्याप्रकारची असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सौम्याने स्वत:ची कारकीर्द टीव्ही मालिका ‘ऐसा देस है मेरा’द्वारे सुरू केली होती. यानंतर तिने ‘मेरी आवाज को मिल गई रोशनी’, ‘डान्स इंडिया डान्स’ समवेत अनेक शोमध्ये होस्टिंग अन् अभिनय केला होता. सौम्याला खरी लोकप्रियता ही भाभी जी घर पर है मालिकेने मिळवून दिली. सौम्याने जब वी मेट या चित्रपटातील छोट्या भूमिकेद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.