मध्यान्ह भोजनानंतर 22 विद्यार्थी अत्यवस्थ
06:16 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ हैदराबाद
Advertisement
तेलंगणामधील संगारेड्डी जिह्यातील एका प्राथमिक शाळेतील सुमारे 22 विद्यार्थी मध्यान्ह भोजन सेवनानंतर आजारी पडले. सदर विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आली. 29 जानेवारी रोजी दुपारी विद्यार्थ्यांनी सांबार आणि भात सेवन केल्यानंतर त्यांना पोटदुखी आणि अस्वस्थता यासारखी लक्षणे जाणवू लागली. विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती नियंत्रणात आहे. या घटनेप्रकरणी शाळेतील स्वयंपाकीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून आहाराचे नमुने परीक्षणासाठी पाठविण्यात आले आहेत.
Advertisement
Advertisement