Satara : आगाशिवनगर येथील पतीच्या मृत्यूनंतर अपघातात गंभीर पत्नीचाही दुर्दैवी अंत
भिवघाटजवळ दोन चारचाकींचा जोरदार धडक,
कराड : गुहागर-विजयपूर राज्य मार्गावर तामखडीजवळ २९ डिसेंबरला सायंकाळी साडे सहाच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात आगाशिवनगर येथील विश्वास चौगुले ठार झाले होते. तर त्यांच्या पत्नी सुरेखा चौगुले गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
चौगुले हे कुटुंबीयांसमवेत अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून कराडकडे परत येत असताना भिवघाट जवळील तामखडी गावाजवळ समोरासमोर दोन चार चाकींची भीषण धडक झाली. या धडकेमध्ये चौगुले हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी सुरेखा चौगुले ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. दोन्ही चार चाकीमधील सहा जण जखमी झाले होते. जखमींना तात्काळ भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सुरेखा चौगुले यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. शर्थीचे प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. आज सकाळी सातच्या सुमारास त्यांचे निधन झाले. कृष्णा चौगुले या रुग्णालयात सुपरवायझर म्हणून काम पाहत होत्या. त्यांच्यावर कोल्हापूर येथे कोल्हापूर येथील कसबा बावडा या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. विश्वास चौगुले यांचा राजकीय सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. आमदार अतुल भोसले यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. रियल इस्टेटचा त्यांचा व्यवसाय होता. आण्णा म्हणून ते परिसरात परिचित होते. मलकापूर परिसरात त्यांचा मित्रपरिवार होता.