तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची घटना ताजी असताना आता पक्षाचे ज्येष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर जमावाने हल्ला केल्याच घटना घडली आहे. या घटनेने पश्चिम बंगालमधील राजरकारण हिंसक आणि तणावपूर्ण बनण्याची चिन्हे दिसत आहेत.
Advertisement
मिळालेल्या माहितीनुसार खासदार कल्याण बॅनर्जी हे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना विरोध झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी , विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात निवेदन सादर करण्यासाठी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात पोहोचलेले असताना जमावाकडून हल्ला झाला.
निवडणुकीनंतरच्या हिंसाचारामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना भेटण्यासाठी सोनारपूरला गेलेल्या अभिषेक बॅनर्जी यांना काही लोकांनी मारहाण केल्याच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली .
Advertisement
कोलकाताजवळ टीएमसीचे कल्याण बॅनर्जी यांच्यावर 'हल्ला'
हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूरचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि टीएमसी प्रतिनिधी मंडळाच्या इतर सदस्यांना 'चोर' असे संबोधून काही लोकांनी काळे झेंडे दाखवल्याने चंडीताला पोलीस स्टेशनबाहेरील परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
आंदोलनादरम्यान आपल्या डोक्याला मार लागल्याने आपण जखमी झाल्याचा दावा खासदाराने केला. पीटीआयने एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ते आपल्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक कापड धरून खाली पडल्याचे दिसले.
भाजपाचा हात असल्याचा आरोप
या हल्ल्यामागे भाजप समर्थक असल्याचा आरोप त्यांनी केला. "हे सर्व पोलिसांसमोर घडले. माझ्या डोक्याला मार लागला आणि रक्त वाहत आहे," असे सांगून त्यांनी या हल्ल्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांना जबाबदार धरले.
त्यानंतर लोकसभा खासदाराने पोलिसांवर कारवाई न केल्याचा आरोप करत धरणे आंदोलन केले. त्यांनी असेही सांगितले की, "भाजप पुरस्कृत हल्ले" म्हणून वर्णन केलेल्या प्रकाराविरोधात टीएमसी आपले आंदोलन सुरूच ठेवेल.
परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून परिसरात पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय दलांची मोठी तैनाती करण्यात आली. हे आरोप फेटाळत भाजपने दावा केला की, राज्यभरातील जनता टीएमसी नेत्यांविरोधात आपला संताप व्यक्त करत आहे.
ममता बॅनर्जींचा आरोप
निवडणुकीनंतरच्या हिंसाचारामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना भेटायला सोनारपूरला गेलेला अभिषेक, शनिवारी तिथे त्याच्यावर दगड आणि अंडी फेकल्यानंतर किरकोळ जखमी झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला, ज्याला टीएमसीने डायमंड हार्बर लोकसभा खासदाराच्या हत्येचा प्रयत्न म्हटले आहे. रात्रभर चाललेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आणि इतर दोघांना ताब्यात घेतले.
टीएमसी सर्वेसर्वा ममता बॅनर्जी म्हणाल्या: “आता लोकांना उपचार नाकारले जात आहेत. रुग्णालयांवर धोका आहे... त्यांच्यावर घरीच उपचार होतील... जर त्यांनी हेल्मेट घातले नसते... तर त्यांचा जागीच मृत्यू झाला असता.”