For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीरियानंतर जॉर्डनवर संकटाचे सावट

06:28 AM Dec 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीरियानंतर जॉर्डनवर संकटाचे सावट
Advertisement

इस्रायलने घेतली मदतीसाठी धाव  

Advertisement

वृत्तसंस्था/ अम्मान

सीरियात बंडखोरांकडून बशर अल-असाद शासनाच्या पतनानंतर आणखी एका इस्लामिक देशावर धोका निर्माण झाला आहे. सीरियात बंडखोरांना मिळालेली आघाडी पाहता जॉर्डनमध्ये देखील कट्टरपंथीय उचल घेऊ शकतात, यामुळे राजे अब्दुल्ला यांच्या राजवटीला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती इस्रायलने व्यक्त केली आहे. या चिंतेदरम्यान इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी जॉर्डनचा दौरा केला आहे. सीरियन संघर्ष जॉर्डनमध्ये फैलावू शकतो आणि याचा प्रभाव थेट इस्रायलवर पडू शकतो हे पाहता इस्रायलच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली आहे.

Advertisement

इस्रायलची सुरक्षा यंत्रणा शिन बेटचे प्रमुख रोनेन बार आणि आयडीएफ गुप्तचर संचालनलयाचे प्रमुख मेजर जनरल श्लोमी बिंदर यांनी अलिकडेच जॉर्डनचा दौरा केला आहे. अरब राजनयिकांनी देखील यावरून चिंता व्यक्त केली आहे. इजिप्त, जॉर्डन आणि शेजारी देशांचे अधिकारी सीरियातील घडामोडींवर करडी नजर ठेवून आहोत असे एका अरब राजनयिकाकडून सांगण्यात आले आहे.

इस्रायलने स्वत:च्या शेजारी मुस्लीम देशांसोबत गुप्त बैठका घेतल्या आहेत. इस्रायलसोबतच्या बैठकीत जॉर्डनच्या गुप्तचर सेवेचे संचालक अहम हुस्नी आणि वरिष्ठ सैन्य कमांडर्सनी भाग घेतला आहे. सीरियाची स्थिती आणि बंडखोर सुमहांसोबत इस्रायल आणि जॉर्डनच्या भागीदारीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. जॉर्डनद्वारे इस्रायलच्या ताब्यातील वेस्टबँकेत सशस्त्र समुहांकडून इराणकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र तस्करीच्या वाढत्या धोक्यावरही चर्चा झाली आहे.

अन्य देशांमध्ये फैलाव शक्य

सीरियात बंडखोरांना मिळालेले यश अन्य देशांमध्ये देखील धार्मिक कट्टरवाद्यांच्या आंदोलनाला बळ मिळवून देऊ शकते अशी भीती अरब देशांना सतावू लागली आहे. सीरियातील बंडखोर सध्या उदारमतवादी भूमिका घेत असले तरीही भविष्यातील त्यांच्या कृतीबद्दल सांगणे अवघड असल्याचे अरब राजनयिकाने म्हटले आहे.

सीरियातील मुख्य बंडखोर समूह हयात तहरीर अल-शामचे (एचटीएस) प्रमुख अबू मोहम्मद अल जुलानीने एका मुलाखतीत इस्रायलकडून व्यक्त करण्यात आलेल्या चिंतांबद्दल भूमिका मांडली आहे. सीरियात असाद शासनानंतर कुठल्याही नव्या संघर्षानंतर उतरण्याची आमची इच्छा नाही. इस्रायलने आता सीरियात हल्ले करण्याची आवश्यकता राहिलेली नसल्याचे जुलानीने म्हटले आहे. सीरियात असाद शासनाच्या पतनानंतर इस्रायलने सुमारे 500 हवाई हल्ले केले आहेत.

रणनीतिक भागांवर कब्जा

आयडीएफ, शिन बट आणि अमेरिकेतील जॉर्डनच्या दूतावासाने बैठकीबद्दल टिप्पणी करण्यास नकार दिला. तर मागील 10 दिवसांमध्ये इस्रायलच्या सैन्याने सीरियाच भूभाग ताब्यात घेण्याचे सत्र आरंभिले आहे. इस्रायलचे सैन्य अनेक रणनीतिक स्थानांवरही कब्जा करत आहे.  यात माउंट हर्मनवरील सीरियन सैन्य चौकी देखील सामील आहे. हे क्षेत्रातील सर्वात उंच ठिकाण आहे.

Advertisement
Tags :

.