For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहा फेऱ्यांनंतर आनंद, निहाल संयुक्त आघाडीवर

06:43 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
सहा फेऱ्यांनंतर आनंद  निहाल संयुक्त आघाडीवर
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदने सुऊवातीच्या धक्क्यातून सावरत दोन विजय नोंदवले आणि येथे झालेल्या टाटा स्टील चेस इंडिया रॅपिड स्पर्धेच्या सहा फेऱ्यांनंतर तो निहाल सरिनसोबत संयुक्तपणे आघाडीवर पोहोचला. चौथ्या ते सहाव्या फेरीत खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये चुरशीचे सामने झाले आणि गुणतालिकेतील अव्वल स्थानावर वारंवार बदल झाले.

आनंद आणि निहाल दोघेही प्रत्येकी 4.5 गुणांसह बरोबरीत आहेत. चौथ्या फेरीत 56 वर्षीय आनंद खेळाच्या मधल्या टप्प्यात दबाव निर्माण करत असल्याचे दिसत होते, परंतु हत्तीच्या बाबतीत केलेल्या चुकीमुळे अर्जुन एरिगेसीला बाजी पलटवण्याची संधी मिळाली. या तऊण भारतीय खेळाडूने संयमाने बचाव केला आणि नंतर अंतिम टप्प्यातील चुकीचा फायदा घेत विजय निश्चित केला. तथापि, आनंदने जोरदार पुनरागमन करत पुढील दोन फेऱ्यांमध्ये हॅन्स निमन आणि वोलोडार मुर्झिन यांच्याविऊद्ध पूर्ण गुण मिळवले आणि अव्वल स्थान पटकावले.

Advertisement

दरम्यान, निहालने सलग तीन विजय मिळवून संयुक्तरीत्या आघाडी घेतली. त्याने प्रथम निमनच्या चुकीचा फायदा घेतला, त्यानंतर मुर्झिनविरुद्ध सुंदर बॅक-रँक कम्बिनेशन केले आणि विदित गुजरातीला अंतिम टप्प्यात पराभूत करताना उत्कृष्ट तंत्राचे प्रदर्शन घडविले. दुसरीकडे, अरविंद चिदंबरम वेई यीकडून पराभूत झाला, तर आर प्रज्ञानंदने पाचव्या फेरीत मुर्झिनवर पद्धतशीरपणे मात केली.

आनंद आणि निमन यांच्यातील सामन्यात भारतीय खेळाडूने शांतपणे बचाव केला आणि नंतर हत्तीच्या चाली आणि उत्कृष्ट प्याद्यांच्या रचनेच्या जोरावर विजय मिळवला. विदित आणि प्रज्ञानंद यांनी लवकर सामना बरोबरीत सोडवला, तर अर्जुनने अंतिम टप्प्यात विजय मिळवला. अरविंदला वेस्ली सोकडून अंतिम टप्प्यातील प्याद्याच्या बाबतीत केलेल्या चुकीबद्दल शिक्षा भोगावी लागली. सहाव्या फेरीत आनंदने मुर्झिनविरुद्ध खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले.

महिला गटात कॅटेरिना लॅग्नो सहा फेऱ्यांनंतर 4.5 गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. भारतीय खेळाडूंमध्ये वंतिका अग्रवाल तीन गुणांसह पाचव्या स्थानावर असून हरिका द्रोणावल्ली, आर. वैशाली आणि रक्षिता रवी यांचे समान 2.5 गुण झालेले आहेत. विश्वविजेती दिव्या देशमुख दोन गुणांसह तळाशी आहे. रक्षिताने नाना झाग्निद्झेला पराभूत करून आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडविले, तर लॅग्नोने दिव्याविऊद्ध अंतिम टप्प्यातील फायद्याचे रूपांतर विजयात केले आणि स्टावरौला त्सोलाकिडूने एका नियंत्रित लढतीत वंतिकावर मात केली. त्यानंतर अलेक्झांड्रा गोर्याचकिनाने सुऊवातीचा दबाव सहन करून दिव्यावर विजय मिळवला, तर झाग्निद्झेने कॅरिसा यिपच्या सुऊवातीच्या चुकीचा फायदा उठवला आणि वंतिकाने रक्षिताला या स्पर्धेतील पहिला पराभव पत्करण्यास भाग पाडले. त्यानंतर वैशालीनेही रक्षिताला पराभूत केले, तर लॅग्नोने त्सोलाकिडूला हरवून स्पर्धेत एकट्याने आघाडी घेतली.

Advertisement
Tags :

.