For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौदीनंतर कुवैतसोबत पाकिस्तानची हातमिळवणी

06:45 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
सौदीनंतर कुवैतसोबत पाकिस्तानची हातमिळवणी
Advertisement

भारतासाठी टेन्शन वाढणार : तुर्किये अन् सौदी अरेबियासोबत यापूर्वीच संरक्षण करार

Advertisement

देशांतर्गत चहुबाजूला बंडसदृश स्थितीला सामोऱ्या जाणाऱ्या पाकिस्तानला सध्या नवा छंद जडला आहे. आखातात स्वत:चे ‘सैन्य नेटवर्क“ निर्माण करण्याचा हा छंद आहे. अलिकडेच सौदी अरेबिया आणि तुर्कियेसोबत संरक्षण भागीदारी केल्यावर आता पाकिस्तान कुवेतसोबत हातमिळवणी करत आहे. पाकिस्तान आणि कुवेतदरम्यान सैन्य सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एका द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी झाली आहे. या संरक्षण कराराला अधिकृतपणे ‘प्रोटोकॉल अॅग्रिमेंट-2026’ हे नाव देण्यात आले आहे.

वृत्तसंस्था, इस्लामाबाद

Advertisement

देशात चहुबाजूला बंडसदृश स्थितीला सामोऱ्या जाणाऱ्या पाकिस्तानला सध्या नवा छंद जडला आहे. आखातात स्वत:चे ‘सैन्य नेटवर्क’ निर्माण करण्याचा हा छंद आहे. अलिकडेच सौदी अरेबिया आणि तुर्कियेसोबत संरक्षण भागीदारी केल्यावर आता पाकिस्तान कुवैतसोबत हातमिळवणी करत आहे. पाकिस्तान आणि कुवैतदरम्यान सैन्य सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एका द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी झाली आहे. या संरक्षण कराराला अधिकृतपणे ‘प्रोटोकॉल अॅग्रिमेंट-2026’ हे नाव देण्यात आले आहे.

इस्लामाबादमध्ये कुवैतचे संरक्षणमंत्री शेख अब्दुल्ला अली अब्दुल्ला अल-सालेम अल-सबाह आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी करारावर स्वाक्षरी केली. यानंतर कुवैतच्या संरक्षण मंत्रालयाने याला क्षेत्रीय सुरक्षेसाठी एक ‘मैलाचा दगड’ संबोधिले. करार 5 वर्षांपर्यंत लागू राहणार आहे. यानंतर जर कुठलाही देश यातून बाहेर पडण्याचा औपचारिक निर्णय घेत नसेल तर हा करार आपोआप पुढे वाढू शकतो.

संरक्षण करारात काय?

या कराराद्वारे दोन्ही देशांदरम्यान पूर्वीपासून असलेल्या संरक्षण सहकार्याला अधिक व्यवस्थित आणि सक्रीय केले जाईल. करारात अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याचा उल्लेख आहे. याच्या अंतर्गत दोन्ही देशांचे सैन्य संयुक्त सैन्य प्रशिक्षण आणि सराव करणार आहे. तर सैन्यशिक्षण आणि प्राविण्यताही हस्तांतरित होणार आहे. गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि लॉजिस्टिक्समध्ये सहकार्य वाढविण्यात येईल. याचबरोबर पाकिस्तानचे सैन्य कुवैतच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यास मदत करणार आहे.

तणावाच्या पार्श्वभूमीवर करार

पश्चिम आशियात तणावाची स्थिती असताना पाकिस्तान आणि कुवैत यांच्यात हा करार झाला आहे. इराण आणि अमेरिकेदरम्यान जारी युद्धाचा प्रभाव आखाती देशांवर पडत आहे. कुवैत देखील इराणच्या हल्ल्यांना सामोरा गेला आहे. इराणने कुवैतच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले आहे. तसेच इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद करण्यात आल्याने कुवैतच्या अडचणी वाढल्या आहेत. कुवैत स्वत:च्या तेल निर्यातीसाठी याच सागरी मार्गावर बऱ्याचअंशी निर्भर आहे. अशा परिस्थितीत कुवैत पाकिस्तान सोबत स्वत:चे सैन्य संबंध मजबूत करू इच्छित आहे.

आखातात वाढतोय पाकिस्तानचा सैन्यप्रभाव

या कराराला पाकिस्तानसाठी मोठी कामगिरी मानले जातेय. मागील काही काळात पाकिस्तानने आखाती देशांसोबतच्या स्वत:च्या संरक्षण संबंधांना अत्यंत वेगाने मजबूत केले आहे. यापूर्वी पाकिस्तानने सौदी अरेबिया आणि तुर्कियेसोबत संरक्षण करार केला होता. या कराराच्या अंतर्गत तिन्ही देशांपैकी कुणा एकावर हल्ला झाल्यास तो तिघांवरही हल्ला मानला जाईल. आता कुवैतसोबत नव्या कराराच्या बळावर पाकिस्तान आखाती क्षेत्रात सैन्य प्रभाव वाढल्याचा दावा करू शकतो.

भारताला चिंता वाटावी का?

सध्या या कराराला भारतासाठी थेट सैन्य धोका मानले जात नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाकिस्तान आणि कुवैतच्या करारात एका देशावरील हल्ला दुसऱ्या देशावरील हल्ला मानण्याची कुठलीच तरतूद नाही. हा करार सध्या मुख्यत्वे सैन्यप्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि संरक्षण सहकार्य वाढविण्यापुरती मर्यादित आहे. परंतु भारतासाठी पाकिस्तानच्या आखाती क्षेत्रातील वाढत्या प्रभावावर नजर ठेवणे आवश्यक आहे. खासकरून भारताच्या नौदलाला आखाती क्षेत्रात सागी मार्गांवर नजर ठेवावी लागेल. या सागरी मार्गांवर पाकिस्तान स्वत:च्या वाढत्या प्रभावाचा भारताविरोधात करणार नाही हे सुनिश्चित करावे लागेल.

Advertisement
Tags :

.