For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेवानिवृत्ती नंतर पोलीस उपअधिक्षक आर.आर.पाटील यानी मिळवली कायद्याची पदवी

07:44 PM Dec 18, 2023 IST | Kalyani Amanagi
सेवानिवृत्ती नंतर पोलीस उपअधिक्षक आर आर पाटील यानी मिळवली कायद्याची पदवी
Advertisement

शिक्षणात ३७ वर्षातील खंडानंतर मिळवले यश : भावी पिढीला प्रेरणा

Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस अधिक्षक पदावर कायदा सुव्यवस्थेचे काम कर्तव्य निष्ठेने पार करीत जनसामान्यांच्या मनात आढळस्थान निर्माण करणारे सेवा निवृत्त पोलीस उपअधिक्षक आर. आर.पाटील यानी शिक्षणात ३७ वर्षाचा खंड पडल्यानंतर एल.एलबी ही कायद्याची पदवी संपादन करून मिळवलेले यश भावी पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे.

Advertisement

राजाराम रामचंद्र तथा आर.आर. पाटील सन १९८४ साली विज्ञान शाखेतून पदवीधर झाले होते यानतर राज्य शासनाच्या स्पर्धा परिक्षेतून त्याची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली त्यानी पोलीस उपअधिक्षक पदापर्यंन्त यशस्वी काम करून ते सेवानिवृत्त झाले.त्यानी सन २०२१ मध्ये शिवाजी विद्यापीठात कायद्याच्या पदवीसाठी नियमीत प्रवेश घेतला त्यानी त्यामध्ये यश मिळवले आज सोमवार दि. १८ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात त्यानी ही कायद्याची पदवी स्विकारली अन सर्वत्र एकच कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला. कायद्याची विशेष पदवीचे शिक्षण देखील येत्या काही महिन्यात पूर्ण होणार आहे.

राज्यांचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील हे देखील कायद्याचे पदवीधर होते त्याचेच बंधू असलेले आर.आर.पाटील यानी आबांचा वारसा जपत निवृत्ती नंतर कायद्याचे शिक्षण घेतले आता आर. आर. आबांचे सुपूत्र रोहीत आर.आर.पाटील देखील कायद्याचे शिक्षण घेत आहेत.

मार्गदर्शन आणि तरुणांना स्फूर्ती मिळावी यासाठी प्रयत्न

कायद्याची परिपूर्ण माहिती सर्व सामान्य जनतेला नाही त्यामुळे अनेक गुन्हे घडत असतात आशांना मार्गदर्शन करता यावे तसेच तरुण पिढी आम्ही काय करावे तसेच अनेकांना निवृत्त झालेवर देखील रिकाम्या वेळेत काय करावे प्रश्न असतो त्यामुळे वेळेचा सदुपयोग होण्यासाठी शिक्षण कोणत्याही वयात घेवू शकतो शिक्षणात देखील आपण उच्चत्तम स्थान मिळवू शकतो याचा विचार येणाऱ्या पिढीत रुजावा यासाठी कायद्याचे शिक्षण ३७ वर्षाच्या शिक्षणातील खंडानंतर पूर्ण केले.
अँड. आर.आर.पाटील
निवृत्त पोलीस उपअधिक्षक

Advertisement
Tags :

.