For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रश्मिकानंतर आलिया भट्ट सापडली डिपफेकच्या जाळ्यात

02:54 PM Nov 27, 2023 IST | Kalyani Amanagi
रश्मिकानंतर आलिया भट्ट सापडली डिपफेकच्या जाळ्यात
Advertisement

सध्या सोशल मीडियावर डिपफेक व्हिडिओचे प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत अनेक अभिनेत्री डिपफेकच्या शिकार बनल्या आहेत. पण अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर डिप फेक व्हिडिओची चर्चा जास्त सुरु झाली. त्यातच आता आलिया भट्टचा एक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सोशल मिडियावर आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

Advertisement

व्हायरल व्हिडिओमध्ये एका मुलीने निळ्या रंगाचा फुलांचा को-ऑर्डर सेट परिधान केला आहे. ती मुलगी कॅमेऱ्याकडे अश्लील हावभाव करत आहे. या मुलीच्या चेहऱ्यावर आलियाचा चेहरा एडिट केला आहे. मात्र या व्हिडिओमध्ये आलिया नसून दुसरीच मुलगी आहे हे व्हिडीओ पाहिल्यानंतर लगेच कळते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन आलियाचा हा अश्लील व्हिडिओ बनवला आहे. इतकंच नाही तर तो सोशल मीडियावर व्हायरल केला जातो.

याआधी कतरिना कैफ आणि काजोल, सारा यांचे देखील व्हिडिओही व्हायरल झाले.सध्या सायबर सेलची नजर अशा डिपफेक व्हिडिओ बनवणाऱ्यांवर आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.