Dhananjay Munde: माझे वडील गेल्यानंतर दादानी कधी वडिल नाहीत याची जाणीव होऊ दिली नाही ; धनंजय मुंडेंना अश्रू अनावर
अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू
मुंबई : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य पाचजण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की, अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या जाण्याने राज्यातील अनेक नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय.उपमुख्यमंत्री अजित पवांराच्या जाण्याने अनेक राजकीय नेत्यांचा प्रतिक्रीया समोर येत आहे. अशातच धनंजय मुंडेचा व्हिडीओ समोर आला आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसल्याचा या व्हिडिओमधुन दिसुन येत आहे.
धनंजय मुंडेना अश्रू अनावर
या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडेना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. माझे वडील गेल्यानंतर दादानी कधी वडिल नाहीत याची जाणीव होऊ दिली नाही... अजित दादा पवार यांच्या अत्यंत दुर्दैवी अपघाताचे वृत्त समजताच धनंजय मुंडे हे तातडीने बारामती कडे रवाना झाले असून प्रवासादरम्यान आपल्या एका सहकाऱ्यांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते...अजित दादा व धनंजय मुंडे यांचे एक वेगळेच नाते होते. पक्षातील सर्वात लाडका कोण, असे विचारल्यास दादा जाहीरपणे धनंजय मुंडे यांचे नाव घेत असत.. त्यामुळे अजित दादांच्या अकाली निधनाचे धनंजय मुंडे यांच्या साठी दुःख किती मोठे आहे हे न समजण्या पलीकडचे आहे. अजित दादांच्या अकाली निधनाचे अनेकांना विश्वास बसत नाहीये.
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
अजित पवार यांचं पार्थिव आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवण्यात आलं आहे. अजित पवारांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते नेते बारामतीत दाखल होत आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.