भक्तीचा खून करून दागिने फेकले उकिरड्यावर
रत्नागिरी :
शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिचा खून केल्यानंतर दुर्वास पाटील याने तिचा मृतदेह आंबा घाट येथे फेकून दिला होत़ा यापूर्वी दुर्वास व त्याच्या दोघा साथीदारांनी भक्तीच्या अंगावरचे दागिने काढून घेतल़े कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी दुर्वासने खंडाळा येथील एका उकिरड्यावर हे दागिने फेकून दिल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आह़े या प्रकरणी पोलिसांनी भक्तीचे दागिने दुर्वासने फेकलेल्या ठिकाणाहून जप्त केल्याचे सांगितले.
भक्ती मयेकर हिच्या खूनातील मुख्य आरोपी दुर्वास दर्शन पाटील हा अतिशय चलाख असल्याचे समोर येत आह़े भक्ती मयेकर हिचा खून केल्यानंतर दुर्वासने पुरावे नष्ट करण्याचे अतोनात प्रयत्न केले हेत़े 16 ऑगस्ट रोजी भक्ती मयेकर हिचा दुर्वास पाटील, विश्वास पवार व सुशांत नरळकर या तिघांनी गळा आवळून खून केल़ा तसेच मृतदेह चारचाकी गाडीमध्ये भऊन तो आंबा घाट येथून फेकून देण्यात आल़ा हा मृतदेह कोणाच्या हाती लागल्यास तिच्या दागिन्यांवर ओळख होवू नये, याची खबरदारी दुर्वास याने घेतली होती.
30 ऑगस्ट रोजी भक्ती मयेकर हिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळून आला होत़ा त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड बनले होत़े मात्र भक्ती हिच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे तिच्या भावाने हा मृतदेह भक्ती हिचा असल्याचे सांगितल़े दरम्यान पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय ऊग्णालयात आणण्यात आल़ा तसेच मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी न्याय वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आह़े
- उकिरड्यावर दागिने फेकल्याची दिली कबुली
भक्ती मयेकर हिचा खून केल्यानंतर दुर्वासने अंगावरील दागिने काढून घेत सुऊवातीला स्वत:कडे ठेवले होत़े यानंतर पोलिसांकडून चौकशी होवू लागल्याने आपण पकडले जावू, अशी भीती दुर्वासच्या मनामध्ये निर्माण झाली होत़ी त्यानुसार दुर्वासने भक्तीच्या अंगावरील दागिने खंडाळा येथील उकिरड्यावर फेकून दिल़े पोलिसांनी दुर्वास याच्याकडे चौकशी केली असता त्याने दागिने फेकल्याची कबुली पोलिसाना दिल़ी त्यानुसार पोलिसानी घटनास्थळावऊन दागिने हस्तगत केल़े
- तिघा संशयितांना आज न्यायालयापुढे करणार हजर
भक्तीच्या खूनप्रकरणी न्यायालयाने तिचा प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (25, वाटद खंडाळा, रत्नागिरी), विश्वास विजय पवार (41, ऱा कळझोंडी रत्नागिरी) व सुशांत शांताराम नरळकर (40, ऱा आदर्शनगर वाटद खंडाळा) यांना 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होत़ी गुऊवारी संशयितांची पोलीस कोठडी संपत असल्याने पुन्हा त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.