महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुक्तीनंतर गोव्याची सर्वच क्षेत्रात चौफेर प्रगती

12:29 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कृषीमंत्री रवी नाईक यांचे उद्गार : फोंड्यात मुक्तीदिन सोहळा उत्साहात

Advertisement

फोंडा : साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून गोव्याला जरा उशिराच स्वातंत्र्य मिळाले, तरी मुक्तीनंतरच्या गेल्या 62 वर्षांमध्ये सर्वच क्षेत्रात गोव्याने जलदगतीने प्रगती साधली आहे. मुक्त गोव्यात विकासाची फळे चाखताना जबाबदार नागरिक म्हणून आजच्या पिढीला असंख्य ज्ञान अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान विसरता येणार नाही, असे सांगून सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकसंघ राहून राज्य व देशाच्या विकासाला सहकार्य करण्याचे आवाहन कृषीमंत्री रवी नाईक यांनी केले. फोंडा तालुका शासकीय पातळीवरील मुक्तीदिन सोहळ्यात मंत्री रवी नाईक बोलत होते. येथील क्रांती मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून मुक्तीलढ्यातील हुतात्म्यांना त्यांनी आदरांजली वाहिली. तिरंगा फडकावल्यानंतर फोंडा पोलीस पथकातर्फे मानवंदना स्वीकारली. सन 1961 मध्ये गोवा मुक्त झाला, तेव्हा शैक्षणिक व अन्य सुविधा अत्यंत मर्यादित होत्या. विकासाचा पाया घालताना सर्वांत आधी गावोगावी शाळा सुऊ कऊन शिक्षणाच्या प्रसाराला प्राधान्य क्रम देण्यात आला. सुऊवातीची काही वर्षे केंद्रशासीत प्रदेश व त्यानंतर घटक राज्य म्हणून गोव्याने आज चौफेर प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या शैक्षणिक शाखा आज गोव्यात उपलब्ध आहेत.

Advertisement

या शिक्षण प्रसारामुळेच खऱ्या अर्थाने मानवी विकासाला चालना मिळाली, असे रवी नाईक पुढे म्हणाले. कर स्वऊपात जमा होणारा जनतेचा पैसा सरकार विविध योजना व साधनसुविधांच्या माध्यमातून परत जनतेपर्यंत पोचवित आहे. विकासात जाती धर्म विरहीत सर्वांना समान सुविधा व संधी मिळत आहेत. राज्यात रस्ते, पूल व अन्य साधनसुविधा निर्माण करताना संपर्क क्षेत्रातही खूप मोठी मजल मारली आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी जनतेचे सहकार्य व समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, माजी खासदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त अॅङ नरेंद्र सावईकर, नगरसेवक, विविध खात्यांचे सरकारी अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमानंतर तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये इंदिराबाई ढवळीकर हायस्कूल, ढवळी, सरकारी हायस्कूल सदर, फोंडा, लोकविश्वास प्रतिष्ठान विशेष शाळा, ढवळी, एमआयबीके हायस्कूल, खांडेपार या शाळांचा समालेश होता. वंदे मातरम् गिताने कार्यक्रमाची सांगता झाली. गिरीश वेळगेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article