For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाबूबूनंतर आता मिरुमीची चर्चा

06:55 AM Jan 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
लाबूबूनंतर आता मिरुमीची चर्चा
Advertisement

सोशल मीडियावर नवा ट्रेंड

Advertisement

सोशल मीडियाच्या जगतात एक ट्रेंड संपताच दुसरा सुरु होतो. पूर्वी लाबूबूने लोकांचे लक्ष वेधले आणि आता त्याच्याप्रमाणे मिरुमी चर्चेत आले आहे. खासकरून युवा आणि संग्राहकांदरम्यान मिरुमी वेगाने लोकप्रिय होतेय.

काही काळापूर्वीपर्यंत लाबूबू सर्वठिकाणी चर्चेत होते आणि आता त्याची जागा मिरुमीने घेतली आहे. स्वत:चा क्यूट परंतु वेगळा लुक आणि युनिक डिझाइनमुळे मिरुमी युवा आणि संग्राहकांमध्ये वेगाने लोकप्रिय होतेये. इन्स्टाग्राम आणि युट्यूब यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर याची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्याने मिरुमी एक नवा ट्रेंड ठरत आहे.

Advertisement

काय आहे मिरुमी

मिरुमी एक डिझाइनर टॉय/कॅरेक्टर फिगर आहे, ज्याला खास प्रकारच्या आर्ट स्टाइलने निर्माण करण्यात आले आहे. याचा लुक काहीसा क्यूट, थोडा अजब आणि थोडा डार्क फँटेसी टाइपचा आहे, जो सद्यकाळातील युवांना अत्यंत पसंत पडत आहे. मिरुमीला लोक केवळ खेळणी नव्हे तर कलेक्शन आयटम, डेकोरेशन पीस, सोशल मीडिया स्टेट्स सिंबलप्रमाणे पाहत आहेत.

लाबूबूच्या लोकप्रियतेनंतर लोकांमध्ये डिझाइनर टॉय कल्चरवरून रुची वाढली. आता तोच ट्रेंड पुढे नेत मिरुमी समोर आली असून ते अधिक रंगीतदार आहे. वेगवेगळ्या एक्स्प्रेशनमध्ये उपलब्ध आहे. फोटो आणि रिल्ससाठी परफेक्ट मानण्यात येत आहे. याचमुळे लोक लाबूबूनंतर आता मिरुमीला खरेदी अन् शेअर करू लागले आहेत.

मिरुमीची चर्चा का

मिरुमी सध्या इन्स्टाग्राम रील्स, युट्यूब शॉर्ट्स, पिन्टंरेस्ट आणि एक्सवर वेगाने व्हायरल होतेय. लोक याचे अनबॉक्सिंग व्हिडिओ, कलेक्शन फोटोज, कम्पॅरिजन शेअर करत आहेत. यामुळे हे अधिक ट्रेंडमध्ये आले आहे.

मिरुमीला पसंत करण्याची कारणे...

-युनिक आणि वेगळे डिझाइन

-लिमिटेट एडिशन मॉडेल

-कलेक्शन व्हॅल्यू

-सोशल मीडियावर ट्रेंडिंग होणे

-अनेक लोक गिफ्ट म्हणून खरेदी करत आहेत.

लोकप्रिय होतोय ट्रेंड

लाबूबू काही काळापर्यंत ट्रेंडमध्ये राहिले, त्याचप्रकारे मिरुमी सध्या हाइप स्टेजमध्ये आहे. परंतु याचे नवे डिझाइन, नवे कॅरेक्टर, लिमिटेड कलेक्शन येत राहिल्यास मिरुमी दीर्घकाळापर्यंत चर्चेत राहु शकते. लाबूबूनंतर आता मिरुमीने सोशल मीडिया आणि कलेक्टर मार्केटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. युनिक डिझाइन आणि ट्रेंडी लुकमुळे मिरुमी खासकरून युवांदरम्यान वेगाने लोकप्रिय होतेय.

Advertisement
Tags :

.