महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिजबुल्लाहनंतर हमासही शस्त्रसंधीसाठी तयार

07:00 AM Nov 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रायलने आमचे सदस्य सोडावेत, आम्ही ओलिसांची मुक्तता करू

Advertisement

वृत्तसंस्था/राफा

Advertisement

इस्रायलवरील हल्ल्याच्या सुमारे 14 महिन्यांनंतर हमास देखील हिजबुल्लाहप्रमाणे शस्त्रसंधीसाठी तयार आहे. इजिप्त, कतार आणि तुर्कियेच्या मध्यस्थांना युद्धविराम करार आणि कैद्यांच्या अदलाबदलीसाठी गंभीर आहोत, असे आम्ही कळविले आहे असे हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. यापूर्वी बुधवारी लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात संघर्षविराम झाल्यावर लेबनॉनचे नागरिक उत्तर भागातून दक्षिण भागात परतू लागले आहेत. हा संघर्षविराम अमेरिका आणि फ्रान्सच्या मध्यस्थीमुळे झाला आहे. सुमारे 70 दिवसांपूर्वी सप्टेंबरमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकींमध्ये स्फोटांनंतर इस्रायलचे सैन्य सातत्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांना लक्ष्य करत होते. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह आणि 3,823 लोक मारले गेले आहेत. तर 15,859 लोक जखमी झाले आहेत. हमास इस्रायलच्या सुमारे 100 ओलिसांच्या मुक्ततेच्या बदल्यात 1 हजार पॅलेस्टिनी आणि हमास सदस्यांच्या मुक्ततेसाठी दबाव आणू पाहत आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजीच्या हल्ल्यानंतर हमासने 254 इस्रायलींना ओलीस ठेवले होते. पहिल्या टप्प्यातील चर्चेनंतर 154 इस्रायलींची मुक्तता करण्यात आली होती. परंतु अद्याप 100 जण हमासच्या कैदेत आहेत.

मारेकऱ्यांची मुक्तता मंजूर नाही

हमासच्या घोषणेनंतर ओलिसांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन ग्वीर यांनी ओलिसांच्या बदल्यात 1 हजार मारेकऱ्यांची मुक्तता होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. इस्रायल ओलिसांच्या मुक्ततेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे, परंतु इस्रायलच्या लोकांची हत्या करणाऱ्यांची मुक्तता मंजूर नाही असे ग्वीर यांनी नमूद केले आहे

लेबनॉनचे नागरिक घरी परतण्यास सुरुवात

हिजबुल्लाह-इस्रायल यांच्यात संघर्षविराम झाल्यावर उत्तर लेबनॉनमधून लोक दक्षिण लेबनॉनमध्ये परतू लागले आहेत. 23 सप्टेंबर रोजी इस्रायलच्या घातक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर हजारो परिवारांनी उत्तर लेबनॉनमध्ये धाव घेतली होती. बैरूतमध्ये शेकडो लोक बाइक आणि वाहनांद्वारे सिडोन, गाजियेह आणि टायर शहराच्या दिशेने परतताना दिसून आले आहेत. हे लोक हिजबुल्लाहचा ध्वज आणि इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेलेला नेता नसरल्लाहच्या छायाचित्रासमवेत शहरात परतत होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article