For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

फ्रान्स-इटलीनंतर जर्मनीतही आंदोलनाची धग

06:17 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्स इटलीनंतर जर्मनीतही आंदोलनाची धग
Advertisement

34 शहरांत निदर्शने, हिंसाचार अन् लूटमार

Advertisement

वृत्तसंस्था, बर्लिन

फ्रान्स आणि इटलीनंतर तरुणांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाची धग जर्मनीतही पोहोचली आहे. देशातील विविध शहरांत हजारो तरुणांनी वाढती महागाई आणि शिक्षणाच्या अर्थसंकल्पातील कपातीविरोधात निदर्शने केली. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. काही शहरांत दुकानांची तोडफोड आणि लूटमार झाल्याची तसेच पेट्रोल बॉम्ब फेकून मालमत्तांना आग लावण्याच्या घटना घडल्या.

Advertisement

‘जेन-जी रेगेल्ट“ या समुहाने या निदर्शनांचे आयोजन केले होते. हॅलोवीनच्या वेशभूषेत आणि मुखवटे घालून आलेले आंदोलक बर्लिन, फ्रँकफर्ट आणि म्युनिचसह 34 शहरांमध्ये जमले. दिवसा बहुतांश ठिकाणी निदर्शने शांततेत झाली, मात्र संध्याकाळी काही ठिकाणी हिंसाचार सुरू झाला.

अनेक शहरांत तोडफोड अन् लूटमार

फ्रँकफटंमध्ये मुखवट घातलेल्या काही आंदोलकांनी दुकानांमध्ये लूटमार केली. पोलिसांवर दगड आणि पेट्रोलबॉम्ब फेकण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्याठी पाण्याचा मारा केला. जर्मनीची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या फ्रँकफर्टमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अनेक दुकानांच्या काचा फोडण्यात आल्या. आपत्कालीन सेवांतील कर्मचाऱ्यांवरही पेट्रोल बॉम्बने हल्ला झाला. फ्रँकफर्टमध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला असून अन्य शहरांतही अधिकारी जखमी झाले. या आंदोलनांमध्ये काही अतिरेकी गट सहभागी झाल्याचा दावा पोलिसांनी केला.

हॅलोवीनच्या वेशभूषेत आंदोलक

युरोपमध्ये हॅलोवीन साजरा होत असताना ही निदर्शने झाली. त्यामुळे अनेक आंदोलक हॅलोवीनच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. काही जण बॅटमॅन, हल्क आणि इतर सुपरहिरोंच्या वेशात, तर काही डायनासोर, ड्रॅगन आणि व्हॅम्पायरच्या रुपात दिसले.त्यांच्या हातातील फलकांवर ‘प्रतिरोधाची वेळ आली आहे“ आणि ‘मर्ज यांनी जावे“ अशा घोषणा लिहिल्या होत्या.

महागाई विरोधात आंदोलन

आंदोलकांनी वाढती महागाई, शाळा अन् विद्यापीठांची स्थिती, सरकारी खर्चातील कपात तसेच लष्करी खर्चातील वाढ यांचा विरोध केला. अनिवार्य सैन्यसेवेच्या प्रस्तावालाही त्यांनी विरोध दर्शविला. शिक्षण, सार्वजनिक सेवा आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

Advertisement
Tags :

.