For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘चांद्र-मंगळ’नंतर आता शुक्रयान मोहीम

06:25 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘चांद्र मंगळ’नंतर आता शुक्रयान मोहीम
Advertisement

इस्रोच्या तीन मोठ्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : आता थेट नासाला आव्हान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने बुधवारी इस्रोसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. मंत्रिमंडळाने शुक्रयान म्हणजेच व्हीनस ऑर्बिटर मिशनला (व्हीओएम) हिरवा कंदील दाखविला आहे. चांद्रयान आणि मंगळयान यशस्वी झाल्यानंतर आता शुक्राचा अभ्यास करण्याचे लक्ष्य आहे. शुक्र आपल्या ग्रहाच्या जवळ असल्यामुळे त्याच्या अभ्यासातून नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला  जाणार आहे. तसेच या प्रकल्पाद्वारे इस्रो थेट नासाला आव्हान देणार आहे.

Advertisement

‘व्हीओएम’मध्ये एक विशेष अंतराळयान तयार केले जाणार असून ते केवळ ग्रहाच्या अभ्यासासाठी शुक्राभोवती फिरेल. शुक्राचा पृष्ठभाग, उप-पृष्ठभाग, वातावरण, सूर्याचा प्रभाव इत्यादीची माहिती या मोहिमेतून घेतली जाणार आहे. एकेकाळी शुक्र हा राहण्यायोग्य ग्रह होता पण नंतर तो बदलला असा दावा केला जात असल्याने या बदलाचाही अभ्यास केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इस्रोशी संबंधित अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये चांद्रयान-4, शुक्रयान मोहीम (व्हीओएम), भारतीय अंतराळ स्थानक आणि पुढील पिढीतील प्रक्षेपण वाहने विकसित करणे यासारख्या प्रस्तावांचा समावेश आहे. इस्रोने यापूर्वीच चंद्रावर तीन मोहिमा पाठवल्या आहेत. चांद्रयान-3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर आणि रोव्हर यशस्वीरित्या उतरवले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इस्रोशी संबंधित अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये चांद्रयान-4, व्हीनस मिशन, भारतीय अंतराळ स्थानक आणि पुढील पिढीतील प्रक्षेपण वाहने विकसित करणे यासारख्या प्रस्तावांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर इस्रो यावर काम सुरू करेल. हे प्रकल्प अतिशय महत्त्वाचे आणि मोठे आहेत. इस्रो आधीच मंगळ मोहिमेवर काम करत आहे. यासोबतच गगनयान मोहिमेलाही मान्यता देण्यात आली आहे. भारत गगनयानद्वारे आपले अंतराळवीर पाठवण्याच्या योजनेवर काम करत आहे.

चांद्रयान-4 काय करणार?

इस्रोने यापूर्वीच चंद्रावर तीन मोहिमा पाठवल्या आहेत. चांद्रयान-3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर आणि रोव्हर यशस्वीरित्या उतरवले होते. चंद्रावर उतरल्यानंतर पृथ्वीवर परत येण्याचे तंत्रज्ञान विकसित करून ते चांद्रयान-4 मोहिमेद्वारे जगाला दाखविण्याची योजना आहे.

शुक्र मोहिमेचे उद्दिष्ट

शुक्र मोहिमेचे उद्दिष्ट तेथील वातावरण समजून घेणे आहे. यासाठी इस्रो व्हीनस ऑर्बिटर मिशनवर काम करत आहे. यामुळे शुक्र ग्रहाविषयी सखोल माहिती समजण्यास खूप मदत होईल. ही मोहीम 2028 मध्ये पार पडली नाही तर सर्वोत्तम प्रक्षेपण विंडो 2031 मध्ये असेल. शुक्रयान हे ऑर्बिटर मिशन असून  अंतराळयान शुक्र ग्रहाभोवती फिरताना त्याचा अभ्यास करेल. त्यात अनेक वैज्ञानिक पेलोड असतील. पण दोन सर्वात महत्त्वाचे पेलोड्स हाय रिझोल्युशन सिंथेटिक अपर्चर रडार आणि ग्राउंड पेनेटेटिंग रडार असतील. गेल्यावषी इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी शुक्र ग्रहाचे वातावरण आणि त्याचे अम्लीय वर्तन समजून घेण्यासाठी तेथे यान पाठवणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. या मोहिमेतून वातावरणाच्या दाबाचा अभ्यास करता येईल. शुक्राचा वायुमंडलीय दाब पृथ्वीपेक्षा 100 पट जास्त आहे.

गगनयान मोहीम

इस्रो आधीच गगनयान मोहिमेवर काम करत आहे. याअंतर्गत अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. त्याचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने इस्रोच्या उ•ाणाला आणखी बळ मिळणार आहे. इस्रो सध्या जगातील सर्वात विश्वासार्ह अवकाश संस्था बनली आहे. अमेरिकन एजन्सी नासाच्या सहकार्याने ते अनेक प्रकल्प करत आहेत. ते जगातील सर्व देशांचे उपग्रह अवकाशात पाठवत आहे.

गगनयान मोहिमेची ट्रॅकिंग स्टेशन साईट निश्चित

भारत आपल्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेच्या ‘गगनयान’च्या तयारीत व्यस्त आहे. या मोहिमेत ऑस्ट्रेलियाचेही महत्त्वाचे योगदान आहे. गगनयान मोहिमेसाठी ऑस्ट्रेलियाच्या कोकोस (कीलिंग) बेटावर तात्पुरते ग्राउंड स्टेशन तयार केले जात आहे. यामध्ये ट्रॅकिंग सिस्टीमच्या निर्मितीशी संबंधित नियोजनाचाही समावेश असल्याचे ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी (एएसए) प्रमुख एनरिको पालेर्मो यांनी सांगितले. भारतीय पथकाने या बेटांना भेट देत जागेचे सर्वेक्षण केल. तसेचे तात्पुरत्या ग्राउंड स्टेशनसाठी ते योग्य ठिकाण असल्याची पुष्टी केली. ट्रॅकिंग सिस्टीम सेट करण्यासाठी ते आता ऑस्ट्रेलियन प्रोजेक्ट मॅनेजरसोबत काम करत आहेत.

Advertisement
Tags :

.