अजितदादांनंतर नायकवडींना बाजूला करण्याचा प्रयत्न? सांगलीच्या राजकारणातील 'या' मोठ्या अफवेचे गूढ
तासगावमध्ये कार-मोटरसायकल धडकेत ५५ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत
मिरज : राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार इद्रीस नायकवडी यांना राजीनामा देण्याच्या सुचना दिल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. पण हा एक केवळ राजकीय स्टंट असून, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी किंवा पक्षाने मला राजीनामा देण्याचे सांगितले नाही. तशी चर्चाही नाही. त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असे इद्रीस नायकवडी यांनी स्पष्ट केले.
राज्यपाल नियुक्त कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)कडून इद्रीस नायकवडी यांना आमदारकी देण्यात आली आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एक अल्पसंख्यांक चेहरा म्हणून इद्रीस नायकवडी यांना संधी दिली आहे. अजितदादांच्या पश्चात नायकवडी यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसात महापालिका स्वीकृत नगरसेवक निवडीतराष्ट्रवादीतील संघर्ष विकोपाला गेला. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि महापालिका गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यात आरोप-प्रत्यारोपही झाले. या संघर्षावर निश्चित तोडगा काढण्याची हमी आ. इद्रीस नायकवडी यांनी दिली होती. त्यादृष्टीने बैठकांना जोरही आला होता. पण आज अचानक नायकवडी यांनाच आमदारकीचा राजीनामा देण्याच्या सूचना राष्ट्रवादीच्या युवा नेत्याकडून देण्यात आल्याच्या चर्चेचे राष्ट्रवादीबरोबर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या स्वीय्य सहाय्यकाकडूननायकवडी यांना आमदारकीच्या राजीनाम्याच्या सूचना दिल्याची चर्चा होती. याबाबत आमदार नायकबडी यांनी मात्र या सर्वच चर्चा म्हणजे थातोंड असल्याचा उल्लेख केला. स्वीय्य सहाय्यक किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही जबाबदार नेत्यांनी किंवा पक्षाने आपणाकडे राजीनाम्याची मागणी केली नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही ज्या गोष्टीत तथ्य नाही, त्याची दखल घेण्याची गरज नाही. राजकारणातील काही मंडळी हेतूपुरस्सर अफवा पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही ते म्हणाले.