For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चढ-उताराच्या सत्रात अखेर बाजारात तेजी

06:24 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
चढ उताराच्या सत्रात अखेर बाजारात तेजी
Advertisement

सेन्सेक्स 943 अंकांनी बहरला : आयटी समभाग घसरले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी शेअर बाजारात तेजी राहिली होती. सेन्सेक्स 943 अंकांनी तर निफ्टी 262 अंकांच्या वाढीसोबत बंद झाला. क्षेत्राच्या निर्देशांकात पाहता ऑटो, ऑईल व गॅस निर्देशांक तेजीत होते तर आयटी निर्देशांकावर मात्र दबाव पहायला मिळाला. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 943 अंकांनी वाढत 81666 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 262 अंकांनी वाढत 25088 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 24 समभाग हे मजबुतीसोबत बंद झाले होते.

Advertisement

भारतीय शेअरबाजारात सोमवारी चढ-उताराचा सामना पहावा लागला. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकामध्ये ऑटो, ऑईल व गॅस, मेटल, रिअल्टी, इन्फ्रा व कॅपिटल गुडस् निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. गुंतवणूकदारांनी एफएमसीजी व एनर्जी क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांची खरेदी केलेली दिसून आली. आयटी निर्देशांक मात्र 0.5 टक्के घसरणीसह दबावात बंद झाला होता. समभागांची कामगिरी पाहता तेजी राखण्यात आघाडीवर पॉवरग्रिड कॉर्प, अदानी पोर्टस्, बीईएल, रिलायन्स इंडस्ट्रिज, टाटा मोटर्स पीव्ही या कंपन्यांचे समभाग होते. तर घसरणीमध्ये पाहता श्रीराम फायनान्स, अॅक्सिस बँक, मॅक्स हेल्थकेअर, इन्फोसिस, सिप्ला व टीसीएस यांचे समभाग होते.

रविवारी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने शेअरबाजाराचे कामकाज सुरु होते. रविवारी एसटीटी शुल्क वाढवण्याच्या बातमीने बाजार गडगडताना दिसला. सेन्सेक्स 1546 अंकांनी कोसळला तर निफ्टी 495 अंकांनी घसरणीसह बंद झाला होता. याचदरम्यान 1 फेब्रुवारी रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी 588 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले होते. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 682 कोटींचे समभाग विक्री केले.

Advertisement
Tags :

.