कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

39 वर्षांनी इनामदार देव रामेश्वर व "श्री कुणकेश्वर यांची झाली ऐतिहासिक भेट

05:24 PM Feb 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा देवस्थान व कुणकेश्वर देवस्थान कडून चोख नियोजन.

Advertisement

आचरा/प्रतिनिधी

Advertisement

संस्थानकालीन आचरे येथील  इनामदार श्री देव रामेश्वर  तरंगाच्यास्वारीसह छञ चामरे, अब्दागिर, निशाण, महालदार, चोपदार, मानकरी यांच्यासह  हजारो  भाविकांच्या  साक्षीने संस्थानी आब राखत आचऱ्याचा राजाची तब्ब्ल ३९ वर्षांनी श्री क्षेत्र कुणकेश्वर ' यांची महास्थळास' जात शाहीभेट 'श्रीं'च्या हुकमाने  झाली. महाशिवरात्री च्या  निमित्ताने 'श्रीं' ची स्वारी आपल्या पूर्वपार पारंपारिक मार्गाने मार्गक्रमण करत उशिरा रात्री कुणकेश्वर येथे पोचली. या उत्सवास   सकाळी बुधवार पासून शाही थाटात प्रारंभ झाला. मृदुंगाची थाप ,सनई ,ढोल, ताशा आणि तुतारीच्या मंजूळ स्वरांनी मंदिर व आजोबाजूच्या परिसराचे वातावरण पूर्णतः भक्तीमय बनले होते. महालदारांची ललकारी होताच नगारखन्यातील चौघडयांच्या निनादातच तोफाही धडाडल्या, बंदूकांच्या  फैरीत आसमंतात उदळल्या आणि . श्री देव रामेश्वराची एतिहासिक स्वारी शाही संस्थानी थाटात क्षेत्र कुणकेश्वर ' महास्थळास '  जाण्यासाठी  आपल्या शाही लवाजम्यासह बाहेर पडली. सर्वत्र श्री देव रामेश्वराच्या स्वगतासाठी ग्रामस्थांनी रस्त्यांवर सडासमार्जन करून जागोजागी पताका, रंगेबेरंगी गुढ्या ,तोरणे चलचित्र देखावे ,उभारली होते.श्री देव रामेश्वराच्या देवस्वारीने आपल्या रयतेह घेतलेली भेट सुवर्ण क्षनांनी उजळून निघाली. आचरा येथील श्री देव रामेश्वर मंदिराकडून बुधवारी सकाळी 10.30 वा च्या सुमारास निघालेली ही देव स्वारी  कुणकेश्वर  येथे  बुधवारी रात्री 11च्या सुमारास पोहचली.देव स्वारीचा सुवर्ण भेटीचा तब्ब्ल 14 तासांचा पारंपरिक  मार्गाने झालेला हा प्रवास हजारो  भाविकांच्या मनातील भाव भक्तीचा आनंद द्विगुणित करणारा ठरला.गुरुवारी दुपारी श्री देव रामेश्वर आपल्या शाही  लवाजम्यासह भक्तांचा गाटीभेटी सुखदु:खे जाणून घेत  28 फेब्रुवारी  ला पहाटे श्री देव रामेश्वर मंदिरात परतल्यानंतर या उत्सवाची सागता होणार आहे.बुधवारी सकाळी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर सकाळी पास्थळामधील देवदेवतांच्या भेटी घेऊन   श्री देव रामेश्वराची स्वारी श्री देव गांगेश्वर मंदिराजवळुन  निघाली.श्री गणपती मंदिराकडून पा रवाडी  येथील श्री ब्राम्हणदेव  मंदिराकडून आचरा पारवाडी येथील नदी किनारी दाखल झाली.नदीतून
होडीच्या  सहाय्याने मुणगे करिवणे येथे दाखल झाली. ठीक ठिकाणी रस्त्यावर शेणाने सारवण करून सडारागोळी काढून धुप धिप लावून गुढ्या तोरणे उभारून प्रत्येक भाविक 'श्री' च्या स्वगतासाठी सूर्याच्या रखरखीत उन्हातही  हजारोंच्या संख्येने या सोहळ्यात भाविक सामील झाले होते.मशवी येथे भाविकांसाठी  मशवी गावातील ग्रामस्थांन कडून अल्पोपहार ची  व्यवस्था  करण्यात आली होती.तसेच हिंदळे येथे ग्रामस्था कडून  शितपेयांचे वाटप करण्यात आले.भर दुपारी मुणगे  करिवणे घाटी चढुन मशवी येथील माळरानवरून मुणगे, बांधाची कोडं हिंदळे, मिठाबां व  येथे सायंकाळी दाखल झाली. तिथे काही वेळ विश्रांती करून 'श्री' ची स्वारी पुन्हा मार्गस्थ झाली.श्री देव गोरश  गणपती येथून कातवणं येथे रात्री पोहचल्यावर थोडा वेळ विश्रांती करून श्री' ची स्वारी पुन्हा मार्गस्थ झाली.कातवण  येथील ग्रामस्थांन कडून खाडी पात्रात 1000  वाळूच्या  गोण्या भरून  सेतू तयार करण्यात आला होता.कातवणं कुणकेश्वर येथील समुद्रकिनारी असलेल्या मारुती मंदिराकडून झुलावा नृत्य करत  क्षेत्र श्री कुणकेश्वर वर येथे श्री ची स्वारी दाखल झाली.कुणकेश्वर मंदिराला तीन प्रदशिणा केल्यानंतर आपला भाऊ असलेल्या श्री देव कुणकेश्वर  ची भेट घेतली. हा तब्ब्ल 40 वर्षा नंतर चा सोहळा 'याची  देही, याची  डोळा 'अनुभवण्या साठी लाखो च्या संख्येने भाविक श्री क्षेत्र कुणकेश्वर  मंदिर दाखल झाले होते.श्री च्या स्वारीत उन्हातून चालत जात असताना भावीकांची प्रकृती खालावली तर लागलीच प्राथमिक औषध उपचारासाठी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. सिद्धू सकपाळ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका, रुग्णवाहीका  तैनात करण्यात आली होती.तसेच अभय राणे यांचा कडून देव स्वारी जाते त्या त्या ठीक ठिकाणी लाल कलर चे कार्पेट  घालण्यात आले होते.श्री च्या स्वारीत सांगली, सातारा, कराड, पंढरपूर, फलटण, बारामती येथून  बँड पथक दाखल झाले होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news# sindhudurg news
Next Article