34 वर्षानंतर एकत्र आले कळे विद्यामंदिरचे विद्यार्थी...स्नेहमेळाव्यातून झाली विचारपूस
सुळे : वार्ताहर
कळे विद्या मंदिर कळे येथील सन 1989-90 सालच्या 89 विद्यार्थांनी तब्बल 34 वर्षानंतर एकत्र येऊन स्नेह मेळावा आयोजित केला होता . दहावीची परीक्षा दिल्यानंतर बहुतांशी मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गाने गेले . करिअरच्या मागे धावत असताना दोस्ताना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं . पण या सर्व माजी विद्यार्थिनी ठरवून सर्व विद्यार्थांना एकत्र करून कळे येथील हरि नारायण सग्स्कृतिक हॉल मध्ये स्नेह मिळावा आयोजित केला होता . विद्यार्थी व तत्कालिन गुरूजन कित्येक वर्षानंतर एकत्र येऊन एकमेकांची विचार फूस करताना मात्र भावूक झाले . हा मेळावा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला . आपले पद . प्रतिष्ठा . कामाचा व्याप बाजूला ठेवून सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमली . यावेळी त्यांच्या चेह्रयावर आनंद ओसाडून वाहत होता . या वेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून शालेय जीवनातील आडवणींना उजाळा दिला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा कुलकर्णी यांनी केली तर सूत्रसंचालन विनायक सातोशे यांनी केली मधुरा पोतदार हिने मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला.
या कार्यक्रमाला विशेष म्हणजे त्यावेळचे शिक्षक तत्कालीन प्राचार्य एम बी घाडगे, सौ . जे . व्ही . घाडगे, सौ . विद्या टंकसाळे . पंडित पाटील, शिवाजी गुरव, एस एस . कालेकर, रंगराव नाईक, बी . एम . पाटील , निळकंठ भोसले , आर .बी . पाटील हे शिक्षक उपस्थित होते यांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला .कार्यक्रमांचे संयोजन कृष्णात कुरणे, संभाजी सूर्यवंशी . महेश झुरे . लहू पाटील . सरदार भोसले . शरद पोतदार यांनी केले .