For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दीड वर्षांपासून प्रेमसंबंध.....नंतर पाठलाग करून 'तू माझ्याशी बोलत का नाहीस?" म्हणत केला विनयभंग; भावालाही दिली जीवे मारण्याची धमकी

05:17 PM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
दीड वर्षांपासून प्रेमसंबंध     नंतर पाठलाग करून  तू माझ्याशी बोलत का नाहीस   म्हणत केला विनयभंग  भावालाही दिली जीवे मारण्याची धमकी
Advertisement

जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरात एका ३२ वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा तसेच तिच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात संशयित विजय मारुती पवार (वय ३८, रा. समडोळे मळा, जयसिंगपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला व संशयित आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. गेल्या दीड वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर येथील एसबीआय एटीएमसमोरील रस्त्यावर तसेच विभुते हायस्कूल समोर असलेल्या रोडवर जयसिंगपूर ते शिरोळ जाणाऱ्या दिशेला संशयिताने दुचाकीवरून पिडीत महिलेचा पाठलाग केला. तसेच 'तू माझ्याशी बोलत का नाहीस?", असे म्हणत तिच्याशी असभ्य वर्तन केले. पिडीतेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.

दरम्यान दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर-शिरोळ मार्गावरील विभुते हायस्कूलसमोरील रस्त्यावर आरोपीने फिर्यादी महिलेचा भाऊ समीर नसरुद्दीन काले यास मागील वादाचा राग मनात धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 'तू आमच्या दोघांमध्ये आलास तर तुला जीवे मारू अशी धमकी देऊन शिवीगाळ केल्याचा आरोपही केला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खोत करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.