For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भविष्यात दोन भागांमध्ये विभागला जाणार आफ्रिका

06:53 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
भविष्यात दोन भागांमध्ये विभागला जाणार आफ्रिका
Advertisement

मध्यभागी तयार होणार महासागर

Advertisement

आमच्या देशाचा भूभाग, जगातील खंड आज जसे दिसतात, तशाप्रकारे त्यांची निर्मिती होण्यासाठी लाखो कोट्यावधी वर्षे लागली आहेत. जगातील सर्व महाखंड एक मोठ्या आणि विशाल महाखंडाचा हिस्सा होते, जो तुटल्यावर आज पृथ्वीवर वेगवेगळे खंड दिसून येतात हे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. त्या विशाल महाखंडाला पँजिया म्हटले जाते. परंतु वैज्ञानिकांनी पुढील काळात महाखंडांचा आकार कसा असेल हे सांगितले आहे. त्यांच्यानुसार आफ्रिका खंड दोन हिस्स्यांमध्ये विभागला जाणार आहे.

आफ्रिका खंड हा पृथ्वीच्या नरम केंद्र आणि पृष्ठभागावरील टेक्टोनिक प्लेट्समुळे विभागला जाणार आहे. या टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचाली सुरू आहेत, याचाच परिणाम म्हणून आगामी काळात आफ्रिकेचे दोन हिस्से होतील आणि मध्ये एक महासागर अस्तित्वात येणार आहे. परंतु हे घडण्यास 5 कोटी वर्षांचा कालावधी लागणार आहे.

Advertisement

अत्यंत मोठी भेग

आफ्रिका जगातील सर्वात मोठ्या भेगांपैकी एकाचे केंद्र असून त्याला द  ईस्ट आफ्रिकन रिफ्ट सिस्टीम (ईएआरएस) म्हटले जाते. ही इतकी मोठी आहे की इथियोपिया, केनिया, द डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा, रवांडा, बुरुंडी, जांबिया, टांझानिया, मलावी आणि मोझाब्कि यासारख्या अनेक देशांमधून ती जाते. यातील अंतर स्पष्ट दिसू लागले असून ही आफ्रिकन प्लेटला दोन हिस्स्यांमध्ये सोमालियन प्लेट अणि न्यूबियन प्लेटमध्ये विभागणार आहे.

 अनेक देशांना मिळणार सागरकिनारे

ही भेग इतकी मोठी आहे की ती भूभागाला खोलवर दोन हिस्स्यांमध्ये विभागणार आहे. छोटा हिस्सा सोमालियन प्लेट ठरेल आणि मोठा हिस्सा न्यूबियन प्लेट ठरणार आहे. या भेगेच्या निर्मितीलाच सुमारे 2.5 कोटी वर्षांचा कालावधी लागला आहे. भविष्यात खंडाला ही जेव्हा दोन हिस्स्यांमध्ये विभागेल, तेव्हा मध्यभागी महासागर निर्माण होणार आहे आणि भूवेष्टित रवांडा, युगांडा, बुरुंडी, द डेमोक्रेटिक रिपलिब्क ऑफ कांगो, मलावी आणि जांबियाला सागरकिनारे मिळणार आहेत.

मोठ्या भेगेने वेधले लक्ष

2018 मध्ये केनियाच्या खोऱ्यात 50 फूट खोल आणि 65 फूट रुंद भेग दिसून आली होती. टेक्टोनिक प्लेटमुळे हे घडले का केवळ अतिवृष्टीमुळे झालेले हे भूस्खलन आहे असा प्रश्न उपस्थित झाला होता. खोऱ्याचा टेक्टोनिक आणि ज्वालामुखी हालचालींचा इतिहास राहिला आहे. भेग अलिकडच्या इतिहासात टेक्टोनिकस्वरुपात निष्क्रीय राहिली आहे. परंतु पृथ्वीच्या केंद्रस्थानी हालचाली होत असतील, याचा प्रभाव आता पृष्ठभागावर सर्वत्र दिसून येत असल्याचे भूगर्भशास्त्रज्ञ डेव्हिड एडेडे यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.