महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अफगाणचा विजयरथ कायम, आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकाविजय

06:50 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसऱ्या सामन्यात तब्बल 177 धावांनी विजय : सामनावीर रशीद खानचे 19 धावांत 5 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ शारजाह

Advertisement

अफगाणिस्तानने दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी पराभव केला. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात अफगाणने 50 षटकांत 4 बाद 311 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना फिरकीपटू रशीद खान (19 धावांत 5 बळी) व नंगेलिया खरोटे (4 बळी) भेदक माऱ्यासमोर आफ्रिकेचा डाव अवघ्या 134 धावांवर आटोपला. या विजयासह अफगाण संघाने 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना दि. 22 रोजी होईल. विशेष म्हणजे, अफगाण संघाचा हा आफ्रिकेविरुद्ध पहिलाच मालिकाविजय आहे.

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 311 धावा केल्या. रहमनउल्लाह गुरबाजने शतकी खेळी साकारताना 110 चेंडूत 105 धावा केल्या. रेहमत शाहने 50 धावांचे योगदान दिले. या दोघांनंतर अजमतुल्ला उमरझाईने शानदार खेळी केली. उमरझाईने 50 चेंडूत 6 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 86 धावा केल्या, ज्याच्या जोरावर अफगाणिस्तानने 4 गडी गमावून 311 धावा केल्या.

आफ्रिकेची सपशेल शरणागती

लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. टेंबा बवुमा आणि टोनी डी जोर्जी यांच्यात पहिल्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी झाली. कर्णधार बवुमा 38 धावा करून अजमतुल्लाचा बळी ठरला, तर टोनीला रशीद खानने बाद केले. रीझा हेंड्रिक्सने 17 धावांचे योगदान दिले. यानंतर राशिद खान आणि नंगेलिया खरोटे यांच्या फिरकीची जादू चालली आणि दक्षिण आफ्रिकेने एकामागून एक विकेट गमावल्या. एकवेळी आफ्रिकेची 3 बाद 98 अशी स्थिती होती. पण अवघ्या 14 धावांत त्यांनी 4 बळी गमावले. शेवटी रशीद खानने मॅरक्रमला 21 धावांवर बाद करत आफ्रिकेची शेवटची आशा संपवली व आफ्रिकन संघ अवघ्या 134 धावांवर ऑलआऊट झाला. फिरकीपटू रशीदने 19 धावांत 5 गडी बाद केले तर खरोटेने 26 धावांत 4 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.

प्रथमच मालिकाविजय

अमेरिकेत झालेल्या आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेत रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाण संघाने धमाकेदार कामगिरी साकारत अनेक दिग्गज संघांना पराभूत केले होते. आता, शारजाह येथे सुरु असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या दोनही सामन्यात अफगाण संघाने आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. या दोनही सामन्यातील विजयासह वनडे क्रिकेटमध्ये प्रथमच आफ्रिकेविरुद्ध  मालिकाविजय मिळवला आहे. मालिकेतील तिसरा सामना केवळ औपचारिक असेल.

Advertisement
Next Article