महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अफगाणचा भारताला धक्का

06:31 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विश्वचषक पात्रता फुटबॉल : 2-1 फरकाने अफगाण विजयी

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

Advertisement

फिफा मानांकनात भारतापेक्षा खालच्या क्रमांकावर असणाऱ्या अफगाण संघाने यजमान भारताला 2026 फिफा वर्ल्ड कप दुसऱ्या फेरीच्या पात्रता लढतीत 2-1 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का दिला. सुनील छेत्रीचा हा 150 वा सामना होता आणि त्याने 94 वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला होता.

अलीकडच्या काळातील भारताचा हा सर्वात नामुष्कीजनक पराभव असल्याचे मानले जात आहे. या माईलस्टोन सामन्यात छेत्रीकडून जी अपेक्षा होती, ती त्याने पूर्ण केली. त्याने 37 व्या मिनिटाला स्पॉट किकवर वैयक्तिक 94 वा गोल नोंदवला. हारून अमिरीने पेनल्टी क्षेत्रात चेंडूत हाताळल्यामुळे भारताला ही पेनल्टी मिळाली होती. 71 व्या मिनिटाला रहमत अकबरीने अफगाणला बरोबरी साधून दिली. गुरप्रीत सिंगला पिवळे कार्ड मिळाल्यानंतर शरीफ मुखम्मदने 88 व्या मिनिटाला पेनल्टीवर निर्णायक गोल नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या दोन संघातील पहिल्या टप्प्यात सौदीमधील आभा येथे 22 मार्च रोजी झालेल्या सामन्यात गोलशून्य बरोबरी साधली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article