महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अफगाणिस्तान - श्रीलंका कसोटी उद्यापासून

06:36 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

कोलंबो येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविऊद्धच्या एकमेव कसोटी सामन्याची तयारी करत असताना श्रीलंकेला त्यांची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी बदलण्याची आशा लागून राहिली आहे. कसोटीसाठी नवनियुक्त कर्णधार धनंजया डी सिल्वा हा संघाचे नेतृत्व करत असून श्रीलंका जागतिक कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीतील आपली स्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात आहे.

Advertisement

सध्या क्रमवारीत तळाशी असलेल्या श्रीलंकेला ऑक्टोबरमध्ये याच मैदानावर झालेल्या शेवटच्या कसोटीत पाकिस्तानकडून एक डाव आणि 222 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. मधल्या फळीतील फलंदाज आणि ऑफस्पिनर डी सिल्वाने कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेचे नेतृत्व करण्यासंदर्भात उत्साह दाखविला आहे आणि संघाच्या यशात योगदान देण्यासाठी तो उत्सुक आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेच्या संघात तीन नवीन खेळाडूंचा समावेश आहे. दुखापतीमुळे नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविऊद्धच्या मालिकेत खेळू न शकलेला वेगवान गोलंदाज कसून रजिथाने पुनरागमन केले आहे.

पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील पराक्रमासाठी ओळखला जाणारा अफगाणिस्तान श्रीलंकेविऊद्ध पहिली आणि एकदंरित आठवी कसोटी खेळणार आहे. 2017 मध्ये कसोटी दर्जा मिळाल्यापासून अफगाणिस्तानने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ठसा उमटवला आहे. आता एक मजबूत कसोटी संघ बनण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

संघ-श्रीलंका : धनंजय डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस, दिमुथ कऊणारत्ने, निशान मदुष्का, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, सदीरा समरविक्रमा, रमेश मेंडिस, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो, कसून रजिथा, कमिंदू मेंडिस, प्रभाथ जयसूर्या,  लाहिरू उडारा, चमिका गुणसेकरा, मीलन रतनायके.

अफगाणिस्तान: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झद्रन, अब्दुल मलिक, नूर अली झद्रन, रहमत शाह, बहीर शाह, नासिर जमाल, इक्रम अलीखिल, मोहम्मद इशाक, कैस अहमद, झिया-उर-रहमान, झहिर खान, यामीन अहमदझाई, निजात मसूद, मोहम्मद सलीम, नवीद झद्रन.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article