For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अफगाण-लंका मालिका मार्च महिन्यात

06:48 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
अफगाण लंका मालिका मार्च महिन्यात
Advertisement

वृत्तसंस्था / काबुल

Advertisement

अफगाण आणि श्रीलंका यांच्यात टी-20 आणि वनडे क्रिकेट मालिका मार्च महिन्यात आयोजित केल्याची घोषणा अफगाण क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने केली आहे. या मालिका संयुक्त अरब अमिरातमध्ये 13 ते 25 मार्च दरम्यान खेळविल्या जाणार आहेत.

उभय संघात तीन सामन्यांची टी-20 तसेच त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 13 मार्चला शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळविला जाईल. त्यानंतर या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना 15 आणि 17 मार्च रोजी होणार आहे. या मालिकेनंतर उभय संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 20 मार्चपासून प्रारंभ होईल. पहिला सामना 20 मार्च, दुसरा सामना 22 मार्च आणि तिसरा सामना 25 मार्चला होईल. हे सर्व वनडे सामने दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविले जातील. 2024 च्या प्रारंभी अफगाण आणि श्रीलंका यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळविल्या गेल्या होत्या आणि या मालिकांसाठी अफगाणने लंकेचा दौरा केला होता. यजमान लंकेने या दोन्ही मालिका जिंकल्या होत्या. वनडे मालिकेत लंकेने अफगाणचा 3-0 तर टी-20 मालिकेत अफगाणचा 2-1 असा फडशा पाडला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.