For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वर्ल्ड कपसाठी अफगाण संघ जाहीर

06:33 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
वर्ल्ड कपसाठी अफगाण संघ जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था/ काबूल

Advertisement

अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने 2 जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी अफगाण क्रिकेट मंडळाने मंगळवारी 15 सदस्यांचा संघ जाहीर केला. या संघामध्ये सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या अफगाणच्या आठ क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी अष्टपैलू रसिद खानकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. 2023 च्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणचे नेतृत्त्व करणाऱ्या हसमतुल्ला शाहिदीला मात्र अफगाण क्रिकेट निवड समितीने वगळले आहे. डावखुरा सलामीचा फलंदाज हजरतुल्ला झेझाई, सिद्धीक्वेला अटल, मोहम्मद सलीम शफी यांची या स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विविध संघांकडून अफगाणचे रशिद खान, अझमतुल्ला ओमरझाई, नूर अहमद, फजलहक फारूकी, नवीन उल हक, मोहम्मद नबी, रेहमतुल्ला गुरबाज, गुलबदीन नईब हे अफगाणचे 8 खेळाडू खेळत आहेत. आता या आठही खेळाडूंचा अफगाणच्या टी-20 विश्व चषक स्पर्धेसाठीच्या संघात समावेश आहे. अफगाणने निवडलेल्या या संघामध्ये 4 फलंदाज तसेच 6 अष्टपैलूंचा समावेश आहे. 3 वेगवान गोलंदाजांचाही यामध्ये सहभाग आहे. 2022 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्व चषक स्पर्धेला अष्टपैलू जेनत, इशाक आणि नूर यांना मुकावे लागले होते. 2024 च्या टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत एकूण 20 संघांचा समावेश राहील. अफगाणचा क गटात समावेश आहे. या गटामध्ये न्यूझीलंड सहयजमान विंडीज, युगांडा, पापूआ न्यू गिनीया यांचाही या गटात सहभाग आहे. अफगाणचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 3 जून रोजी युगांडाबरोबर खेळविला जाणार आहे.

Advertisement

अफगाण संघ - रशिद खान (कर्णधार), गुरबाज, इब्राहिम झद्रन, ओमरझाई, नजिबूल झद्रन, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदीन नईब, करीम जनत, एन. खरोटी, मुजिब उर रेहमान, नूर अहमद, नवीन उल हक, एफ फारूकी, फरीद अहमद मलिक. राखीव - एस अटल, हजरतुल्ला झेझाई, मोहम्मद सलीम शफी.

Advertisement
Tags :

.