महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अफगाणिस्तानचा आफ्रिकेला दे धक्का

06:00 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिल्या वनडेत 6 गडी राखून दणदणीत विजय

Advertisement

वृत्तसंस्था/शारजाह

Advertisement

अफगाणिस्तानने आणखी एक कारनामा करताना क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली. बुधवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात अफगाण संघाने दक्षिण आफ्रिकेवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रारंभी, अफगाणिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर आफ्रिकन संघ 106 धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य अफगाण संघाने 26 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय मिळवला. विशेष म्हणजे, वनडेत अफगाणिस्तानने आफ्रिकेवर प्रथमच विजय मिळवला आहे.

प्रारंभी, आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, फजलहक फारुकी आणि अल्लाह गजनफर या जोडीसमोर आफ्रिकन फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. फारुकीने चार तर गजनफर यानं तीन विकेट घेतल्या. तर, राशिद खान यानं दोन विकेट घेतल्या. आफ्रिकेकडून वियान मुल्डरने 52 धावांची खेळी केल्याने त्यांना शंभर धावांचा टप्पा ओलांडता आला. यानंतर अफगाण संघाने विजयासाठीचे किरकोळ आव्हान 26 ओव्हरमध्ये 4 विकेटच्या मोबदल्यात पार केले. गुलबदिन नईबने सर्वाधिक 34 तर ओमरझाईने 25 धावा केल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article