महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अफगाणिस्तान पहिल्यांदच सेमिफायनलमध्ये

06:58 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अफगाणचे एका दगडात दोन शिकार : बांगलादेशला हरवले अन् ऑस्ट्रेलियाचे पॅकअप केले

Advertisement

वृत्तसंस्था/ सेंट व्हिन्सेंट, वेस्ट इंडिज

Advertisement

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी करत सेमिफायनलमध्ये धडक मारली. पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात अफगाण संघाने बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. बांगलादेशच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आता अफगाणिस्तान 27 जूनला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता आफ्रिकेला भिडणार आहे. सेमिफायनलचा हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जाईल.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाण संघाने 20 षटकांत 5 गडी गमावत 115 धावा केल्या. बांगलादेशच्या डावात पावसाचा व्यत्यय आल्याने त्यांना 19 षटकांत 114 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 105 धावांवर ऑलआऊट झाला. नवीन उल हक व रशीद खान यांनी प्रत्येकी चार बळी घेत अफगाणच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची फलंदाजी सुरुवातीपासून ढासळली. सलामीवीर रेहमानुल्ला गुरबाज वगळता कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. गुरबाजने 55 चेडूंत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 43 धावा केल्या. तर इब्राहिम झद्रनने 29 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. तर अझमतुल्लाहने 10, गुलबदिनने 4 धावा केल्या. मोहम्मद नबी 1 तर करीम 7 धावा करून बाद झाला. यानंतर रशीद खानने नाबाद 19 धावा केल्या. यामुळे अफगाण संघाला 5 बाद 115 धावा करता आल्या. बांगलादेशकडून रशीद हुसेनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर तस्कीन, मुस्तफिजूरने 1-1 विकेट मिळवली.

बांगलादेशचे फलंदाज फ्लॉप

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेला बांगलादेश संघ अफगाणच्या गोलंदाजीसमोर ढेपाळला. लिटन दास वगळता इतर सर्व बांगलादेशी फलंदाज अपयशी ठरले. ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्याने बांगलादेशचा डाव 17.5 षटकांत 105 धावांवर आटोपला. लिटन दासने सर्वाधिक 49 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सौम्या सरकारने 10 तर तौहीद ह्य्दोयने 14 धावा केल्या. या सामन्यात अफगाणी गोलंदाजांनी शानदार कामगिरी साकारली. अखेरच्या काही षटकात दोन्ही संघात मोठी चुरस होती, पण गुलाबदिन नईब, नूर अहमद व नवीन उल हक यांनी शानदार गोलंदाजी करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक :

अफगाणिस्तान 20 षटकांत 5 बाद 115 (रेहमानउल्लाह गुरबाज 43, इब्राहिम झद्रन 18, रशीद खान नाबाद 19, रिशाद हुसेन 3 बळी, तस्कीन अहमद व मुस्तफिजूर रेहमान प्रत्येकी एक बळी).

बांगलादेश 17.5 षटकांत सर्वबाद 105 (लिटन दास नाबाद 54, सौम्या सरकार 10, तौहीद 14, नवीन उल हक व रशीद खान प्रत्येकी चार बळी).

अफगाणिस्तान प्रथमच उपांत्य फेरीत, द.आफ्रिकेशी भिडणार

अफगाणिस्तान संघ 2010 पासून टी-20 विश्वचषक खेळत आहे, आता 2024 मध्ये प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ही सध्या त्यांची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. रशीद खानच्या नेतृत्वाखालील या युवा संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. आता, उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.

सुसाट अफगाणिस्तान

अफगाणिस्तानने या विश्वचषकात युगांडाविरुद्ध विजय नोंदवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर संघाने न्यूझीलंडचा पराभव केला. अफगाणिस्तानने आपल्या सुपर 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून मोठी खळबळ उडवून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतरच अफगाणिस्तानला सेमिफायनल गाठण्यासाठी बांगलादेशला पराभूत करणे गरजेचे होते, आणि संघाने नेमके तेच केले. सुपर 8 मधील दोन विजयांसह अफगाणिस्तानने गट 1 मधून उपांत्य फेरीत प्रवेश केला. गट 1 मधून उपांत्य फेरीत धडक मारणारा अफगाणिस्तान हा भारतानंतरचा दुसरा संघ ठरला आहे.

दुखापतीमुळे गेला लंगडत, सामना जिंकताच आला धावत

अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्यात पावसाने सातत्याने व्यत्यय आणला. पावसामुळे वेळोवेळी समीकरण, लक्ष्य बदलताना दिसत होते. अफगाणिस्तान या सामन्यात एक पाऊल पुढे होते पण तरीही बांगलादेशने शेवटपर्यंत हार मानली नाही. सामन्यादरम्यान अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी संघाला इशारा केला. गुलबदीन नईब क्षेत्ररक्षणासाठी स्लीपला थांबला होता आणि अचानक दुखापतीचं नाटक करुन खाली पडला. नईब सामन्यादरम्यान सकाळी 10:01 वाजता दुखापतीमुळे बाहेर गेला होता. परंतु अफगाणिस्तानने 10:34 वाजता सामना जिंकला तसा तो अतिशय वेगाने मैदानात धावत आला आणि सामना जिंकल्याचा आनंद साजरा करु लागला. दरम्यान, नईबचा हा प्रकार सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

काबूल ते कंदाहार...देशभरात जल्लोष

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अफगाणिस्तान संघ सेमिफायनलसाठी पात्र ठरला. हा रोमांचक सामना जिंकल्यानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. तर स्टेडियममधील अफगाणिस्तान फॅन्ससुद्धा जल्लोषाचा आनंद घेत होते. परंतु अफगाणिस्तानमध्ये काबूलपासून कंदाहारपर्यंत रस्त्यावर विजयाचा जल्लोष करण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. तेथील लोक जल्लोष करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

सेमिफायनलचे वेळापत्रक

  1. अफगाणिस्तान वि. दक्षिण आफ्रिका

27 जून, सकाळी 6 वाजता, त्रिनिदाद

 

  1. भारत वि. इंग्लंड

27 जून, रात्री 8 वाजता, गयाना

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article