For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अफगाणचा संघ जूनमध्ये भारत दौऱ्यावर

06:42 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अफगाणचा संघ जूनमध्ये भारत दौऱ्यावर
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

अफगाणचा क्रिकेट संघ येत्या जून महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याला भारत आणि अफगाण क्रिकेट मंडळाकडून हिरवा कंदिल मिळाला असल्याचे समजते. 2018 नंतर उभय संघात पहिल्यांदाच कसोटी सामना खेळविला जाणार आहे.

जूनमध्ये अफगाणचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आणि एकमेव कसोटी सामना खेळविला जाणार आहे. 6 जूनपासून उभय संघातील एकमेव कसोटी नवी चंदीगडमध्ये होणार आहे. तर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 14 जूनला धर्मशाला येथे, दुसरा सामना 17 जूनला लखनौमध्ये तर तिसरा सामना चेन्नईत 20 जूनला होईल. प्रथमच या दोन संघामध्ये द्विपक्षीय वनडे मालिका खेळविली जात आहे. आतापर्यंत या दोन संघात वनडे क्रिकेट प्रकारात आशिया चषक तसेच विश्वचषक स्पर्धेत गाठ पडली होती. 2024 साली झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सुपर-8 फेरीत भारत आणि अफगाण यांच्यात शेवटची गाठ पडली होती.

Advertisement

सध्या भारतात सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघाची ही पहिली मालिका राहील. त्याचप्रमाणे आयसीसीची विश्वचषक टी-20 स्पर्धा संपल्यानंतर श्रीलंकेचा संघ अफगाणच्या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघ येत्या जुलै महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहेत. या मालिका 1 ते 19 जुलै दरम्यान होतील.

Advertisement
Tags :

.