अफगाणचा क्रिकेटपटू शापूर झद्रन कालवश
06:50 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
Advertisement
अफगाणचा वेगवान गोलंदाज शापूर झद्रनचे वयाच्या 38 व्या वर्षी दीर्घकालीन आजाराने निधन झाले.
झद्रनने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 2009 ते 2020 या 11 वर्षांच्या कालावधीत 44 वनडे आणि 36 टी-20 सामन्यांत अफगाणचे प्रतिनिधीत्व केले. मंगळवारी अफगाण क्रिकेट मंडळाने झद्रनच्या निधनाचे वृत्त अधिकृतपणे जाहीर केले. झद्रनने 36 टी-20 सामन्यांत 37 गडी बाद केले. तसेच या प्रकारात त्याने 2018 च्या जूनमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 40 धावांत 3 गडी बाद करून सर्वोच्च कामगिरी केली होती. तसेच त्याने 9 प्रथमश्रेणी सामन्यात 17 बळी मिळविले आहेत. 56 लीस्ट ए सामन्यात त्याने 57 गडी बाद केले आहेत. चालु वर्षाच्या प्रारंभी वैद्यकीय इलाजासाठी झद्रनला दिल्लीत हलविण्यात आले होते. अफगाण क्रिकेट मंडळातर्फे त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.
Advertisement
Advertisement