For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रवाशांसाठी स्वस्त विमान प्रवास भाडे सुरु

06:29 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रवाशांसाठी स्वस्त विमान प्रवास भाडे सुरु
Advertisement

इंडिगोची नवीन ‘इंडिगो लाइट’भाडे योजना 

Advertisement

वृत्तसंस्था नवी दिल्ली 

इंडिगोने आपल्या प्रवाशांसाठी ‘इंडिगो लाइट’ भाडे योजना सुरू केली आहे. इंडिगोची नवीन ‘इंडिगो लाइट’ भाडे योजना केवळ केबिन बॅगेजसह प्रवास करणाऱ्या आणि अतिरिक्त सेवांची आवश्यकता नसलेल्या प्रवाशांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.

Advertisement

देशातील अग्रगण्य विमान कंपनी इंडिगोने आपल्या प्रवाशांसाठी ‘इंडिगो लाइट’ नावाचा एक नवीन परवडणारा पर्याय सुरू केला आहे. इंडिगोची नवीन ‘इंडिगो लाइट’ भाडे योजना केवळ केबिन बॅगेजसह प्रवास करणाऱ्या आणि अतिरिक्त सेवांची आवश्यकता नसलेल्या प्रवाशांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या नवीन पर्यायाअंतर्गत, प्रवासी स्वस्तात प्रवास करू शकतात आणि अतिरिक्त सुविधांसाठी पैसे देणे टाळू शकतात. कंपनीने माहिती दिली आहे की, या नवीन भाडे योजनेचे बुकिंग 1 जुलैपासून सुरू झाले आहे, तर 15 जुलै 2026 पासून प्रवास करणारे प्रवासी याचा लाभ घेऊ शकतील.

इंडिगोचा नवीन लाईट फेअर पर्याय

इंडिगो लाईट फेअर विशेषत: अशा प्रवाशांसाठी तयार करण्यात आला आहे, जे फक्त हँडबॅग किंवा केबिन बॅगेज घेऊन प्रवास करतात. या पर्यायामध्ये प्रवाशांना फक्त त्याच सेवांसाठी पैसे द्यावे लागतील ज्यांचा ते प्रत्यक्षात वापर करतील. यामुळे प्रवासाचा एकूण खर्च कमी होईल. एअरलाइन्सचे म्हणणे आहे की, या उपक्रमामुळे प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार सेवा निवडण्याचा पर्याय मिळेल आणि प्रवासाच्या खर्चावर अधिक चांगले नियंत्रण ठेवता येईल.

एटीएफ स्वस्त झाले

1 जुलैपासून केंद्र सरकारने देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) ची किंमत प्रति लिटर 5 रुपयांनी कमी केली आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर दिल्लीत एटीएफची किंमत प्रति लिटर सुमारे 110 रुपयांपर्यंत वाढली आहे. इंधन हा विमान कंपन्यांच्या सर्वात मोठ्या परिचालन खर्चांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत, एटीएफ स्वस्त केल्याने विमान कंपन्यांचा खर्च कमी होईल अशी अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.