महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंटचा शिल्लक कर भरण्याची रेल्वेची ग्वाही

01:21 PM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

29 कोटी रुपये नैर्त्रुत्य रेल्वेकडून मिळण्याची अपेक्षा

Advertisement

बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानक, तसेच रेल्वे क्वॉर्टर्स हे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीमध्ये आहेत. मागील अनेक वर्षांपासून रेल्वेचा विविध प्रकारचा कर थकीत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप तो कर रेल्वेकडून जमा करण्यात आलेला नाही. तब्बल 29 कोटी रुपयांचा कर रेल्वेकडून थकविण्यात आला असून लवकरच तो आपण भरू, असे आश्वासन नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव यांनी दिले.

Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्डकडून रेल्वे विभागाला अनेक सेवा दिल्या जातात. त्या बदल्यात त्यांच्याकडून कर घेतला जातो. परंतु, नैर्त्रुत्य रेल्वेने अनेक वर्षांपासून हा कर भरलेला नाही. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या कॅन्टोन्मेंटच्या बोर्ड मिटिंगमध्ये चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी आपण रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी हुबळी येथील नैर्त्रुत्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये कॅन्टोन्मेंटचे सीईओ राजीव कुमारही सहभागी झाले होते.

29 कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचे सीईओ राजीव कुमार यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले. याला उत्तर देताना सरव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव म्हणाले, आमचे वरिष्ठ अधिकारी कॅन्टोन्मेंट बोर्डला लवकरच भेट देतील. थकीत कराची शहानिशा करून लवकरच कॅन्टोन्मेंट बोर्डला दिला जाईल, असे सांगितले. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी रेल्वे प्रशासनाला थकीत कर लवकर भरण्याची सूचना केल्या. कॅन्टोन्मेंटकडून महसूल वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ज्या विभागांचा कर थकीत आहे, त्यांना पत्र पाठवून भरण्याची विनंती केली जात आहे. महसूल वाढल्यास बोर्डमध्ये विकासकामे राबविणे सोयीचे होणार असल्याने महसूल जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेकडूनही थकीत कर जमा झाल्यास कॅन्टोन्मेंटमधील विकासकामांना बळ मिळणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article