For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपुलकीचा, जिव्हाळ्याचा तरुण भारत!

12:10 PM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आपुलकीचा  जिव्हाळ्याचा तरुण भारत
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रशंसोद्गार : तरुण भारत, गोवा आवृत्तीची देदीप्यमान 40 वर्षे

Advertisement

पणजी : दैनिक तरुण भारत या वृत्तपत्राने आजवर विश्वासार्हता जपली, त्याचबरोबर जनतेशी आपुलकीची भावना निर्माण केली. त्यामुळे आज गोव्यातील साऱ्या जनतेला हे दैनिक आपले वाटते. तरुण भारत हा आपुलकीचा, जिव्हाळ्याचा आणि दूरदृष्टीकोनाचा आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. दैनिक तऊण भारत, गोवा आवृत्तीच्या चाळीसाव्या वर्धापनदिनाला मुख्यमंत्र्यांनी खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, तरुण भारत हे गोव्यातील अग्रगण्य दैनिक आहे. गेल्या 40 वर्षांत या वर्तमानपत्राने गोव्यातील जनतेच्या मनात आणि प्रत्येक घराघरामध्ये आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. आपल्याला हे दैनिक नेहमीच आपुलकीचे, जिव्हाळ्याचे दैनिक वाटते.

 जनतेच्या मनात, ह्य्दयात तरुण भारत

Advertisement

गेल्या चाळीस वर्षांच्या प्रवासात दैनिक तरुण भारतने समाज प्रबोधनाचे फार मोठे कार्य केले. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेले आहे. गोव्याच्या कला व सांस्कृतिक जीवनातही तरुण भारतचे कार्य फार मोठे आहे. जनतेच्या मनात आणि हृदयात दैनिक तरुण भारतने घर केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 तरुण भारतशिवाय चैन पडत नाही

सकाळी उठल्यानंतर दैनिक तरुण भारतने नेमके काय दिले आहे? हे वाचल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. अत्यंत विचारपूर्वक आणि आवश्यक आहे, तेवढेच महत्त्व हे वृत्तपत्र बातम्यांना देते. रविवारचे लेख किंवा अग्रलेख तसेच विविध पुरवण्या हे तऊण भारतचे खास वैशिष्ट्या आहे. त्यातूनही समाज प्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आजवर दैनिक तरुण भारतने केले आहे. विचार करायला लावणारा आणि दूरदृष्टी सर्वांनाच दाखवणारा दैनिक तऊण भारत हा नेहमीच भारत तरुण आहे, हे दर्शवित असतो.

 भाकिते खरी ठरली

या वर्तमानपत्राने आजवर केलेली बहुतांश भाकिते खरी ठरली आहेत.  विश्वासार्हता जपण्याचे अत्यंत मौलिक आणि महत्त्वाचे कार्य तरुण भारतने केले आहे. त्यामुळेच जोपर्यंत दैनिक तरुण भारतमध्ये बातमी प्रकाशित होत नाही तोपर्यंत सदर वृत्त खरे आहे की नाही हे वाचकांना पडताळून पाहावे लागते.

 लहानपणापासून पाहिले कार्य

दैनिक तरुण भारतचे गोव्यातील 40 वर्षांचे कार्य आपण लहानपणापासून पाहतोय. किरण ठाकुर यांनी सर्वांनाच लळा लावलेला आहे. त्यामुळेच सारी गोमंतकीय जनता त्यांना ‘मामा’ असेच म्हणते. आपण संपूर्ण तरुण भारत परिवाराला गोमंतकीय जनतेच्या वतीने आणि आपल्या कुटुंबीयांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. दूरदृष्टीकोनातून हे वर्तमानपत्र नेहमीच कार्य करीत असते, असे ते म्हणाले.

 तरुण भारतचे मोठे सामाजिक योगदान

तरुण भारतने आजवर अनेक  सामाजिक कार्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यामुळे अनेकांना त्यातून प्रेरणा घेणे शक्य झाले. म्हणूनच दैनिक तऊण भारत हे वृत्तपत्र आज साऱ्या गोव्यात लोकप्रिय ठरलेले आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

 ‘माझे भाकीत तरुण भारतने केले होते’...

आपण त्यावेळी राजकारणात देखील नव्हतो. अशावेळी दैनिक तरुण भारतने 2005 मध्ये आपल्या बाबतीत एक भाकीत केले होते. त्यात डॉ. प्रमोद सावंत हे भविष्यात साखळीचे आमदार होतील आणि नेतृत्व करतील असे म्हटले होते. ती बातमी तसेच रविवारच्या लेखातील आपला उल्लेख या दोन गोष्टी आपण कधीही विसरू शकत नाही. यावरून तऊण भारत किती दूरदृष्टीकोनातून विचार करतो आणि भविष्यातील राजकारण, समाजकारण व इतर बाबतीतही दिशा स्पष्ट करतो हे दिसून आले. आपण स्वत: याचा अनुभव घेतला, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.