For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आद्या बहेती, राजदीप विश्वास विजेते

06:48 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
आद्या बहेती  राजदीप विश्वास विजेते
Advertisement

वृत्तसंस्था / बडोदा

Advertisement

विश्व टेबल टेनिस फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या युथ कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धेत 11 वर्षांखालील वयोगटात मुलांच्या एकेरीचे जेतेपद राजदीप विश्वासने तर मुलींच्या एकेरीचे विजेतेपद आध्या बहेतीने पटकाविले.

मुलींच्या 11 वर्षांखालील वयोगटातील झालेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात आध्या बहेतीने साक्ष्या संतोषचा 15-13, 11-8, 12-10 असा पराभव केला तर मुलांच्या विभागातील अंतिम सामन्यात राजदीप विश्वासने शार्वील करंबळकरचा 11-8, 11-6, 11-13, 11-4 असा पराभव करत विजेतेपद मिळविले. सदर स्पर्धा गुजरातच्या क्रीडा प्राधिकरण मंडळ आणि बडोदा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेतली गेली आहे. या स्पर्धेमध्ये विविध राज्यांतील 226 स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला.

Advertisement

मुलांच्या 15 वर्षांखालील वयोगटात विवान दवेने रिशान चटोपाध्यायवर 9-11, 11-9, 11-6, 11-3 अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. दवेचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रुद्र जेनाशी होणार आहे. रुद्र जेनाने देव प्रणव भट्टचा 11-4, 11-8, 11-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. मुलींच्या 15 वर्षांखालील वयोगटात टॉप सिडेड अंकोलिका चक्रवर्तीने तसेच तनिष्का काळभैरव आणि नैशा रेवास्करने शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले आहे.

Advertisement
Tags :

.