For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोमवारच्या कार्यशाळेमध्ये वकिलांचे मार्गदर्शन

10:23 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोमवारच्या कार्यशाळेमध्ये वकिलांचे मार्गदर्शन
Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य बार असोसिएशन आणि बेळगाव बार असोसिएशनतर्फे पाच दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. दि. 17 रोजी या कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ वकील आणि न्यायधीशांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांनी वक्त्यांचे स्वागत केले. त्यानंतर कार्यशाळेला प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रामध्ये ज्येष्ठ वकील बसवप्रभू होसकेरी यांनी ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती दिली. त्यानंतर ज्येष्ठ वकील मालिनी डी. पाटील यांनी डिजिटल प्रोटेक्शन अॅक्ट याच्याबद्दल माहिती दिली.

Advertisement

दुपारनंतर चौथे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायधीश मोहन प्रभू यांनी पोलीस जेव्हा गुन्हा दाखल करुन घेत नाहीत तेव्हा न्यायालयात खासगी दावा कशा प्रकारे दाखल करायचा. 2024 ला यामध्ये पुन्हा कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे, याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. या कार्यशाळेला मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. बसवराज एम. मुगळी, उपाध्यक्ष ॲड. विजय पाटील, जनरल सेक्रेटरी ॲड. वाय. के. दिवटे, जॉईंट सेक्रेटरी ॲड. विश्वनाथ सुलतानपुरी, सदस्य ॲड. सुमितकुमार अगसगी, ॲड. इरण्णा पुजेर, ॲड. विनायक निंगनुरे, ॲड. सुरेश निंगनुरी, ॲड. अनिल पाटील, महिला प्रतिनिधी ॲड. आश्विनी हवालदार आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष ॲड. शितल रामशेट्टी यांनी आभार मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.