For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विशाल परबांनी आपल्या भानगडीत पडू नये

05:40 PM Oct 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
विशाल परबांनी आपल्या भानगडीत पडू नये
Advertisement

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा सल्ला

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

विशाल परबांनी शहराच्या भानगडीत पडू नये, अन्यथा तुमचे कारनामे बाहेर काढीन," असा इशारा शिवसेनेचे( शिंदे गट) जिल्हाप्रमुख संजू परब यांनी येथे दिला.संजू परब म्हणाले, "विशाल परबांची काय हवा आहे ती मी दीड तासात काढून दाखवली. त्यामुळे त्यांनी माझ्या भानगडीत पडू नये, अन्यथा त्यांना पुन्हा माणगावचा रस्ता धरावा लागेल. जमिनीचे सातबारा बदलू शकता, पण सावंतवाडीतील जनतेचे मन बदलू शकत नाही. त्यामुळे जे कोणी विशाल परबांचे फंटर असतील, त्यांनीही सावध राहावे," असा इशाराही त्यांनी दिला. बांद्यात माझ्या उपस्थितीत उबाठा कार्यकर्त्यांचा प्रवेश घेताना शिवसेनेला विशाल परब यांनी हा धक्का दिल्याचे समजले. मात्र, भाजपात गेलेले हे लोक तासाभरात पुन्हा शिवसेनेत आलेत. श्री. परब यांनी या भानगडीत त्यांनी पडू नये, माझ्या नादाला लागू नये असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला. तर भाजप नेत्यांनी पक्षाची इज्जत घालवून घेऊ नये असाही सल्ला दिला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख परब यांच्यासह महिला जिल्हाप्रमुख ॲड निता सावंत-कविटकर, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, भारती मोरे, परिक्षीत मांजरेकर, संजय पेडणेकर, क्लेटस फर्नांडिस आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. परब पुढे म्हणाले, लाखे बांधवांनी हा पक्षप्रवेश फसवून घेतल्याचे सांगितले. दहशतीला घाबरून आम्ही बोललो नाही असं ते म्हणाले. विशाल परब यांची नाटक मी एका तासात उघड केलीत. माझ्या नादी लागू नये. अन्यथा, मी असा धक्का देईन की त्यांना पुन्हा माणगाव खोऱ्यात जावं लागेल. बाहेरची माणसं अन् असले प्रकार सावंतवाडीत खपवून घेणार नाही. सावंतवाडी शहरात विशाल परब यांनी ढवळाढवळ केल्यास कारनामे बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला. तसेच भाजपच्या नेत्यांनी पक्षाची इज्जत घालवून घेऊ नयेत असा सल्ला दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.