For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा ग्रामपंचायत क्षेत्रातील जाहिरात फलक हटविले

09:59 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा ग्रामपंचायत क्षेत्रातील जाहिरात फलक हटविले
Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

Advertisement

हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विजयनगर, लक्ष्मीनगर व हिंडलगा या सर्व विभागातील फलक हटविण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या आदेशानुसार सर्व भागातील फलक हटविण्यात आले. बेळगाव जिल्ह्यासाठी लोकसभा निवडणुकीची 7 मे 2024 ही तारीख जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यासाठी सरकारी, राजकीय पक्षांच्या जाहिराती, भित्तिपत्रके, भिंतीवरील बॅनर, राजकीय पक्षांच्या कटआउट, मंडळाचे स्वागत फलक, उत्सवांच्या जाहिराती हे सर्व काढण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतद्वारे तंतोतंत पालन करून हे सर्व फलक हटविण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.